'काक्रापार'चं मोदी-शहांकडून कौतुक, पण हे आहे तरी काय? जाणून घ्या...
N4U
१०:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नवी दिल्ली : स्वदेशी तंत्रज्ञानाने अणुऊर्जा प्रकल्प 'प्लांट ३'साठी अणुभट्टी विकसित केल्याबद्दल पंतप्रधान यांनी बुधवारी भारतीय अणुशास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. हे ''चे उत्तम उदाहरण आहे,' असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. गुजरातमधील ७०० मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पाने लक्षणीय यश मिळवले आहे. या प्रकल्पाचा रिअॅक्टर कार्यरत झाला असून, हा प्रकल्प आता ऊर्जानिर्मितीस तयार असल्याचे हे चिन्ह आहे. 'काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प यशस्वी झाल्याबद्दल आपल्या . स्वदेशी बनावटीच्या या प्रकल्पातील ७०० मेगावॉट क्षमतेचा केएपीपी-३ रिअॅक्टर हा मेक इन इंडिया कार्यक्रमाचे झळाळते उदाहरण आहे,' असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलंय. 'भारताच्या इतिहासात मोठा दिवस' काक्रापार अणुऊर्जा प्रकल्प ३ सज्ज झाल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री यांनी भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' दृष्टिकोनातून नवा भारत पुढे जात आहे, असेही शहा यांनी म्हटले आहे. ट्विटरवर शहा म्हणाले, 'भारताच्या अणुइतिहासात हा मोठा दिवस आहे. पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा सातशे मेगावॉट क्षमतेचा काकरापार अणुऊर्जा प्रकल्प ३ सज्ज झाला आहे. या अत्युच्च यशाबद्दल देश आपल्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनाला सत्यात उतरवण्यासाठी नवा भारत मार्गक्रमण करत आहे'. एकाच इंधनाचा पुन्हा - पुन्हा वापर शक्य KAPP-3 चा वापर भारतासाठी मोठं यश मानलं जातंय. अणुऊर्जा तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या देशांच्या यादीत आता भारताचाही समावेशा झालाय. 'क्लोज्ड फ्युएल सायवल'वर आधारीत तीन टप्प्यातील अणुऊर्जा प्रकल्प आहे. एका टप्प्यात वापरलेलं इंधन पुन्हा - पुन्हा प्रोसेस करून पुढच्या टप्प्यासाठी इंधन तयार करण्याची याची क्षमता आहे. काक्रापार एटोमिक पॉवर स्टेशन (KAPS) गुजरातच्या सूरत शहरापासून जवळपास ८० किलोमीटर दूर तापी नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे. या प्लान्टमध्ये बुधवारी KAPP-3 प्लांटचा समावेश करण्यात आला. या प्लांटचं निर्माण 'न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' (NPCIL) कडून करण्यात आलंय. या प्लान्टमध्ये २२० मेगावॅटचे KAPS-1 आणि KAPS-2 हे आणखीन दोन स्टेशन आहेत. पहिल्या प्लांटची सुरुवात १९९३ आणि दुसऱ्याची सुरुवात १९९५ साली झाली होती. KAPP-4 च्या कामालाही लवकरच सुरुवात KAPP-3 च्या निर्माणानंतर आता लवकरच KAPP-4 च्या कामालाही लवकरच सुरूवात होईल अशी आशा व्यक्त करण्यात येतेय. KAPP-3 मार्क -4 टाईप कॅटेगिरीचं यंत्र आहे. 'प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिअॅक्टर्स'चं (PHWR) हे उत्तम उदाहरण आहे. यात सुरक्षेचीही उत्तम पद्धतीने काळजी घेतली गेलीय. या रिअॅक्टरमध्ये 'स्टिम जनरेटर'ही बसवण्यात आलेत, याचं वजन जवळपास २१५ टन आहे. एप्रिल २०१९ मध्ये वर्ल्ड असोसिएशन ऑफ न्युक्लिअर ऑपरेशन्स (WANO) नं KAPP-3 चा प्री स्टार्टअप रिव्हूयदेखील सुरू केला होता.
https://ift.tt/3fcy07h
July 23, 2020 at 10:03AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा