महिलेने अंध व्यक्तीला केली 'ही' मदत, मिळाले घराचे बक्षीस
N4U
१०:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

नवी दिल्ली: केरळमधील एका महिलेने दृष्टिहीन तरूणाला बसमध्ये बसण्यास मदत केली. यासाठी प्रथम त्या महिलेने बस थांबविली आणि कंडक्टरला थांबण्यास सांगितले. यानंतर ती महिला काही पावले मागे गेली आणि दृष्टीदोष असलेल्या व्यक्तीला घेऊन आली. त्यानंतर तिने त्या दृष्टीहीन व्यक्तीला बसमध्ये चढवले. या घटनेचा व्हिडिओ एका व्यक्तीने त्याच्या कॅमेर्याद्वारे शूट केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. व्हिडिओ सोशल मीडियावर येताच व्हायरल झाला. केरळमधील या महिलेचे नाव सुप्रिया असून तिला नि:स्वार्थपणे केलेल्या या सेवेसाठी मिळाले आले. सुप्रिया गेल्या तीन वर्षांपासून तिरुवल्ला येथे असलेल्या जौली स्लिक नावाच्या कापड दुकानात काम करत होती. तिच्या सेवेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. सुप्रियाच्या या उदात्त कार्याची माहिती जोयलुक्कास समूहाचे अध्यक्ष जोय अलुक्कास यांना मिळाली. त्यांनी सुप्रियाला शुभेच्छा दिल्या. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, जॉय अलुकस यांनी सुप्रियाला त्रिशूर येथील मुख्य कार्यालयात बोलावून बक्षीस म्हणून एक नवीन घर दिले. हे घर सुप्रियाच्या नावावर आहे. आम्हाला इतके मोठे काही सरप्राइझ मिळेल असे मला कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया सुप्रियाने दिली. तिथे काम करणाऱ्या लाखो लोकांनी जेव्हा मला शुभेच्छा दिल्या तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. मी केलेले काम हे सहज सोपे काम होते. मला असे वाटले नव्हते की यामुळे मला खूप कौतुक आणि प्रेम मिळेल, असे प्रतिक्रिया व्यक्त करताना सुप्रिया म्हणाल्या. सुप्रियांचा नवरा खासगी नोकरी करतात. वाचा: वाचा: जोली अलुक्कास त्यावेळी बोले, "तुम्ही एवढे चांगले काम केले असेल आणि कदाचित तुला तसे करण्याची प्रेरणा मिळाली असेल. दया या जगात वाहत असते आणि ती कधीच संपत नाही. जोली अलुक्कास यांचे हे शब्द आहेत आणि या शब्दांनी माझे मन जिंकले, असे सुप्रिया म्हणाल्या. व्हायरल होत असलेल्या सुप्रियाच्या व्हिडिओमध्ये ती बसच्या मागे पळत असताना आणि कंडक्टरला बस थांबवण्याची विनवणी करताना दिसते. त्यानंतर त्या सुरक्षितपणे त्या अंध व्यक्तीला बसमध्ये चढवत असतानाही व्हिडिओत दिसत आहेत. सोशल मीडियावर या क्लिपने लाखोंची मने जिंकली आहेत. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
July 23, 2020 at 09:39AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा