N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

...म्हणून माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाही: उद्धव ठाकरे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: 'महाराष्ट्राच्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. जनता सरकारचं ऐकते आहे. सहकार्य करते आहे. जनतेचा हा विश्वास मला बळ देणारा आहे. त्यामुळंच माझ्या चेहऱ्यावर तणाव दिसत नाही,' असं प्रतिपादन मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी आज केलं. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक 'सामना'ला दिलेल्या उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रसिद्ध झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला दिलेली ही पहिली प्रदीर्घ मुलाखत आहे. खासदार यांनी गेले काही दिवस केलेल्या ट्वीटमुळं मुलाखतीची उत्सुकता वाढली होती. अपेक्षेप्रमाणे उद्धव यांनी अनेक प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली. वाचा: करोनाच्या संकटात जगातील अनेक नेते तणावाखाली दिसतात. पण आपल्या चेहऱ्यावर तणाव नाही याचं रहस्य काय, या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी जनतेचा विश्वास असं उत्तर दिलं. ते म्हणाले, 'करोनाच्या काळात फेसबुकच्या माध्यमातून मी लोकांशी संवाद साधला. जनतेशी नातं तुटू दिलं नाही. सरकार प्रत्येक पावली तुमच्या सोबत आहे असा विश्वास दिला. जनतेनंही माझ्यावर, सरकार विश्वास ठेवला. सहकार्य केलं. अजूनही जनता सोबत आहे. सहकार्य करते आहे. हा विश्वास मला बळ देणारा आहे. हे बळ जोपर्यंत माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला ताणतणावाची चिंता करण्याची गरज नाही.' डोक्यावरचे केस कमी दिसताहेत, कारण... कोणताही प्रशासकीय अनुभव नसलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्यावर अचानक मुख्यमंत्रिपदाची धुरा आली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेते मंडळींना सोबत घेऊन सरकार चालवावे लागत आहे. त्या अनुषंगानंही राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले. आपल्या डोक्यावरचे केस थोडे कमी झालेत. सरकारमधील सहा महिन्यांचा हा परिणाम आहे का, या प्रश्नावर मुख्यमंत्री हसून म्हणाले, 'बऱ्याच दिवसांपासून केस कापले नव्हते. ते अलीकडेच कापले. त्यामुळं ते केस कमी दिसताहेत. त्यामागे दुसरं कुठलंही कारण नाही.'

https://ift.tt/3fau8np
July 25, 2020 at 06:18AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा