फोटोफीचर: भारतात ७ कंपन्या बनवताहेत करोनावर लस

भारतातील कमितकमी ७ कंपन्या करोनावरील लस तयार करण्याच्या कामाला लागलेल्या आहेत. या कंपन्यांचे शर्थीचे प्रयत्न सुरूआहेत. यांमध्ये Bharat Biotech, Zydus Cadila, Serum Institute, Mynvax Panacea Biotec, Indian Immunologicals और Biological E या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, देशभरात सुरू असलेल्या सर्व चाचण्यांवर ICMRचे संपूर्ण लक्ष आहे. Covaxin च्या चाचण्याचा संपूर्ण तपशील हा ICMR ला पाठवला जाणार आहे. तेथेच डेटा परीक्षण केले जाईल. या चाचणीमध्ये 'डबल ब्लाइन्ड' तंत्राचाही वापर केला जाणार आहे. यात कोणाला लस दिली जात आहे आणि कोणाला प्लेसीबो याची संशोधक आणि स्वयंसेवक अशा दोघांनाही कल्पना नसणार आहे.
Covaxin य़ा लशीव्यतिरिक्त झायडस कॅडिलाची ZyCoV-D या लशीची देखील टप्पा १ आणि टप्पा २ मधील चाचणी घेण्यासाठी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) मंजुरी मिळवण्यात आलेली आहे. चाचणीच्या पहिल्या टप्प्यात झायडस कॅडिला १००० स्वंयसेवकांना या लशीची डोस देणार आहे. डीएनएवर आधारित ZyCoV-D अहमदाबादच्या व्हॅक्सीन टेक्नॉलॉजी सेंटरने विकसित केली आहे. क्लिनिकल ट्रायल्स रजिस्ट्रीने दिलेल्या माहितीनुसार, लशीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात कमीत कमी एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. या चाचणीद्वारे मिळालेला डेटा DCGI ला सादर केला जाईल. त्यानंतर पुढील टप्प्याच्या चाचणीची परवानगी देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात ७५० स्वयंसेवक सहभागी होतील. तर तिसऱ्या टप्प्यात हजारो स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग केला जाणार आहे.
Covaxin या करोनावरील स्वदेशी लसीकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा आहेत. या स्वदेशी लशीची मानवी चाचणी देशातील विविध संस्थांमध्ये घेणे सुरू झाले आहे. ही चाचणी देखील यशस्वी सिद्ध होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Covaxin ही एक इनअॅक्टिव्हेटेड लस आहे. ही लस ज्या करोनाच्या विषाणूंना मारले गेले होते, त्यांच्या कणांपासून तयार करण्यात आलेली आहे. या लसीचा मानवाला डोस दिल्यानंतर ही लस शरीरात अँटीबॉडी तयार करण्याचे काम करते.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या या लशीची चाचणी रेडकर इन्स्टीट्यूटमध्ये सुरू करण्यात आली आहे. ICMR ने जेथे क्लिनिकल फार्माकॉलॉजी विंग आहेत अशाच संस्थांची निवड केली आहे. अशा संस्थांमध्ये मानवी चाचणी करण्यासाठी त्या कामातील अनुभवी हेल्थकेअर प्रोफेशनल्स आहेत का, याचीही विशेष काळजी घेतलेली आहे. या बरोबरच गेल्या शुक्रवारी रोहतक पीआजीमध्ये Covaxin ची मानवी चाचणी सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी येथे ३ लोकांवर चाचणी घेण्यात आली. त्याचा कोणताही साइड इफेक्ट जाणवला नसल्याचेही सांगण्यात येत आहे.
भारतात तयार करण्यात आलेल्या Covaxin या करोनावरील पहिल्या लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी १५ जुलैपासून सुरू झाली होती. दिल्ली येथील एम्समध्ये पहिल्या टप्प्यातील चाचणी अंतर्गत ही सर्वात मोठी चाचणी केली जात आहे. येथे सोमवारी म्हणजेच २० जुलैपासून लशीची चाचणी सुरू करण्यात आली. एम्समध्ये १०० स्वयंसेवकांवर ही चाचणी केली जात आहे. पाटण्यातील एम्समध्ये या लशीची पहिल्या टप्प्यातील चाचणी सुरू करण्यात आली सुरुवातीला येथील १० स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात आली. पाटण्यातील एम्समध्येच या लशीचा पहिला डोस देण्यात आला. तो यशस्वी झाल्यास आणखी डोस देण्यात येणार आहेत.
भुवनेश्वर येथील इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अॅण्ड एसयूएम (IMS & SUM) या संस्थेत आजपासून Covaxin या नव्या लशीची चाचणी सुरू होत आहे. ICMR ने ज्या सेंटर्स निवड केली आहे, त्यांमध्ये या देखील चाचणीचा समावेश आहे. चाचणीसाठी सर्व आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. येथे पहिल्या टप्प्यात ३० ते ४० स्वयंसेवक सहभागी होत आहेत. त्यांनतर हे सर्व स्वयंसेवक सेंटरच्या संपर्कात राहतील.
https://ift.tt/3fcy07h
July 22, 2020 at 09:10AM
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा