N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

मुख्यमंत्री गेहलोतांची झोप उडाली, रात्री उशिरापर्यंत बैठकांचं सत्र सुरूच

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : यांनी आपल्या समर्थक आमदारांसह बंडखोरी केल्यानंतर आणि आपापल्या भूमिकेवर अडून आहेत. मुख्यमंत्री गेहलोत यांनी सोमवारी विधानसभेचं अधिवेशन बोलावण्याची मागणी केलीय. या अधिवेशनात आपण बहुमत चाचणीला सामोरं जाण्यासाठी तयार असल्याचंही गेहलोत यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे राज्यपाल मात्र आपल्याला कोणताही निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचं कारण पुढे करताना दिसत आहेत. याच दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आपल्या आमदारांसोबत बैठक करताना दिसले. कायदेशीर पर्यायांवर यावेळी विचारमंथन करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांसमोर आपली टीम एकसंध बांधून ठेवण्याचं आव्हान कायम आहे. विधानसभेचं अधिवेशन बोलावण्यासाठी जास्त वेळ लागला तर दोन-चार आमदार हातातून निसटून जाऊ शकतील, अशी धास्ती मुख्यमंत्री गेहलोत यांना वाटतेय. त्यामुळे अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्याची घाईही त्यांना लागलीय. शुक्रवाारी रात्री जवळपास १०.१५ वाजता जयपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजस्थान कॅबिनेटमध्ये बैठकीला सुरुवात झाली. रात्री १२.३० पर्यंत सुरु असलेल्या या बैठकीचा मुद्दा सरकार वाचवणं हाच होता. वाचा : वाचा : काठावर बहुमत गहलोत यांच्याकडे सध्या काँग्रेसच्या १०७ पैकी ८८ आमदार असून, त्यांना १० अपक्ष, २ बीटीपी तसेच रालोद आणि माकपच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा आहे. दोनशे सदस्यांच्या विधानसभेत गहलोत यांच्यापाशी सध्या १०२ आमदारांच्या समर्थनासह आवश्यक बहुमत आहे. पायलट यांच्याकडे सध्या १९ आमदार आहेत. राज्यपालांकडून असहकार्याची भूमिका उच्च न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आपल्या समर्थक आमदारांनिशी राजभवन गाठून राज्यपाल कलराज मिश्र यांच्यासमोर शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. आमदारांना बाहेर हिरवळीवर बसवून गहलोत यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे सोमवारपासून विधानसभेचे अधिवेशन बोलविण्याची विनंती करताना आमदारांच्या सह्यांचे पत्रही सोपविले. मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावरून अधिवेशन बोलविणे राज्यपालांवर बंधनकारक असूनही राज्यपाल टाळाटाळ करीत असल्याबद्दल काँग्रेसच्या गोटात रोष आहे. 'अधिवेशन घेण्याबाबत राज्यपालांनी अद्याप उत्तर दिलेले नसून, ते का उत्तर देऊ शकत नाही, हे त्यांनाच ठाऊक आहे,' असे सांगून राज्यपाल दबावाखाली असल्याचा आरोप मुख्यमंत्री गहलोत यांनी केला. 'लोकशाही हत्या बंद करा', 'सरकार पाडण्याचे कारस्थान बंद करा', अशा घोषणा देत दुपारी गहलोतसमर्थक आमदार राजभवनाच्या हिरवळी बसून होते. आपण कुठलाही निर्णय नियमांनुसार घेऊ, असे राज्यपाल मिश्र यांनी म्हटले आहे. वाचा : यावर, 'जर तुम्ही आणि तुमचं गृह मंत्रालय राज्यपालांचं संरक्षण करू शकत नाही तर राज्यातील कायदे-व्यवस्थेचं काय? राज्यपालांच्या सुरक्षेसाठी एखाद्या एजन्सीशी संपर्क करायला हवं? मी कधीही कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं वक्तव्य करताना ऐकलेलं नाही. ही एक चुकीच्या प्रवृत्तीची सुरुवात नाही का? जिथं आमदार राजभवनात येऊन आपलं विरोध प्रदर्शन करतात?' असं प्रत्यूत्तर देत राज्यपाल कलराज मिश्र यांनी तज्ज्ञांशी बोलूनच विधानसभा अधिवेशनाचा निर्णय घेतला जाईल, असं म्हटलंय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
July 25, 2020 at 09:36AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा