N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'कुणाला कंटाळा आला म्हणून लॉकडाऊन उठवता येणार नाही'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: 'राज्यात केलेला लॉकडाऊन हा कंटाळा घालवण्यासाठी केलेला नव्हता. त्यामुळं कंटाळा आला म्हणून तो उठवताही येणार नाही. घिसाडघाईने लॉकडाऊन उठवला आणि लोक मृत्युमुखी पडले तर त्याची जबाबदारी कोण घेणार?,' असा सवाल मुख्यमंत्री यांनी केला आहे. 'जे काही करायचं आहे, ते सावध पावलं टाकून करणं गरजेचं आहे,' असं त्यांनी म्हटलं आहे. हेही वाचा: शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार, खासदार यांनी त्यांची मुलाखत घेतली. 'लॉकडाऊन कधी उठणार? हाच सध्या राज्यातील जनतेला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. लोक कंटाळले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झालाय हे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर मुख्यमंत्री ठाकरे यांनी सविस्तर भूमिका मांडली. हेही वाचा: 'लॉकडाऊनचा विषय नीट समजून घेणं गरजेचं आहे. सरकार म्हणून आपण एकेक गोष्ट सोडवत चाललो आहोत. घाईघाईने लॉकडाऊन करणं जसं चूक आहे, तसं घाईघाईनं तो उठवणंही चूक आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर साथीचा उद्रेक झाला आणि जीव गेले तर काय करणार? कारखान्यांमध्ये साथ घुसली तर काय करणार? माणसे मेली तरी चालतील पण लॉकडाऊन नको हे चालेल का? माझी ती तयारी नाही. मी म्हणजे डोनाल्ड ट्रम्प नाही. माझ्या डोळ्यासमोर माझी माणसं तडफडताना बघू शकत नाही,' असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. हेही वाचा: 'सध्या कुटुंबच्या कुटुंब आजारी पडताहेत. मृत्यू होताहेत. संपूर्ण कुटुंब दगावल्यावर घराला जे टाळं लागेल ते कोण उघडणार? ते टाळ नको असेल काही गोष्टी आपल्याला टाळायलाच हव्यात. शाळा आणि परीक्षेच्या बाबतीतही माझं तेच मत आहे. काही ठिकाणी शाळा सुरू झाल्या. पण तिथं मुलं बाधित झाली. त्यांना पुन्हा शाळा बंद कराव्या लागल्या. आपल्याकडं तसं होऊ द्यायचं नाही. अंतिम वर्षाच्या परीक्षा व्हायला हव्यात असं मलाही वाटतं. पण आपण त्यातूनही मार्ग काढला आहे. मुलांच्या करिअरचं नुकसान होणार नाही याची काळजी आपण घेत आहोत,' असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

https://ift.tt/3fau8np
July 25, 2020 at 09:33AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा