गँगस्टर विकास दुबेच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

कानपूर, उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या कानापूरमध्ये कुख्यात गँगस्टर याचा काही दिवसांपूर्वी ''सोबत झालेल्या चकमकीत एन्काऊंट मृत्यू झाला होता. अनेकांसाठी हा एन्काउन्टर 'अपेक्षित' असाच होता. साहजिकच दुबेच्या मृत्यूनंतर या 'कथित' एन्काऊन्टरवर तसंच उत्तर प्रदेशातील कायदे-सुव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थि झाले होते. आता विकास दुबे याचा पोस्टमॉर्टेम अहवाल समोर आलाय. या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून विकास दुबे याचा मृत्यू गोळी लागल्यानंतर हेमरेज अर्थात खूप रक्तस्राव झाल्यामुळे तसंच तीव्र धक्क्यामुळे (शॉक) झाल्याचं समोर येतंय. या रिपोर्टममध्ये विकास दुबे याच्या शरीरावर १० जखमा असल्याचंही सांगण्यात आलंय. यातील सहा गोळी लागल्याचे निशाण आहेत तर बाकीचे पळण्याच्या प्रयत्ना दरम्यान पडल्यानं झालेल्या जखमा असल्याचं सांगण्यात येतंय. वाचा : वाचा : रिपोर्टनुसार, तीन गोळ्या दुबेचं शरीर छेदून बाहेर पडल्या आहेत. यातील एक गोळी उजव्या खांद्यावर तर दोन गोळ्या छातीच्या डाव्या बाजुला लागल्या आहेत. त्यामुळे या गोळ्या जवळून मारल्या गेल्याचं प्रदमदर्शनी दिसत असलं तरी पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये मात्र किती अंतरावरून गोळ्या झाडण्यात आल्या? याचा उल्लेख नाही. सर्व गोळ्या विकासच्या समोरच्या भागावर लागल्यानं पळताना विकासनं एसटीएफचा मुकाबला केल्याचंही समोर येतंय. याशिवाय विकासच्या डोक्याला, कोपरा आणि पोटावरही जखमा आहेत. कानपूरच्या बिकरू गावात आठ पोलिसांच्या हत्येचा मुख्य आरोपी विकास दुबे याचा १० जुलै रोजी एसटीएफनं खात्मा केला होता. विकासला मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला उज्जैन हून कानपूरला आणताना एसटीएफच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाला आणि ती उलटली. याच गाडीत विकास दुबे असल्याचं सांगण्यात येतंय. यानंतर विकानं पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. एसटीएफनं त्याला आत्मसमर्पण करण्याचा इशारा दिला परंतु, त्यानं गोळीबार केला. त्यानंतर एसटीएफनं त्याला सहा गोळ्या मारल्या. या चकमकीत त्याचा मृत्यू झाला, असं एसटीएफकडून सांगण्यात आलं होतं. वाचा : वाचा : विकास दुबेच्या अगोदर पोलिसांच्या हत्याकांडात समावेश असलेल्या सहा आरोपींना एन्काऊन्टरमध्ये ठार करण्यात आलं होतं. विकासचा साथीदार प्रभात याला फरिदाबादमध्ये अटक करण्यात आली होती. त्याचीही गाडी पंक्चर झाली, त्यानं पोलिसांचं हत्यार घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत तो मारला गेला, असं सांगण्यात आलं होतं. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
July 20, 2020 at 10:58AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा