धक्कादायक! कोविड रुग्णालयात फिरतायत डुक्कर
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

बेंगळुरू: देशभरात करोनाचा (Corona Virus Outbreak) कहर सुरू असून या काळाता रुग्णालयापासून ते घरांपर्यंत सर्वांना स्वच्छतेची मोठी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सरकार देखील वेळोवेळी सॅनिटायझेशन आणि स्वच्छतेच्या सूचना करत असते. असे असतानाही कर्नाटकातील एका कोविड -१९ रुग्णालयाच्या (Covid-19 Hospital) आवारात चक्क डुकरांचा कळप मुक्तपणे फिरताना दिसतो आहे. हे पाहून इथल्या लोकांना आश्चर्य देखील वाटले नाही याचेच आश्चर्य. रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षाची आता इथल्या लोकांना सवय झालीय की काय, असा प्रश्न पडतो. (Pigs roaming aroung in Govt Hospital) हे डुक्कर रुग्णालयात शिकार करतात, तसेच सतत किंचाळतात देखील. या साथीच्या काळातही आपले कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचा त्रास होत नाही. रुग्णालयातील डुकरांचा अशा प्रकारचा वावर पाहता रुग्णालय व्यवस्थापनाने स्वच्छतेवर पूर्ण दुर्लक्ष केले आहे हे स्पष्ट होत आहे. हा व्हिडिओ बुधवारी कलबुर्गी कोविड हॉस्पिटलमध्ये शूट करण्यात आला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाला. कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी आता हॉस्पिटलच्या अधिका-यांना जागरुक राहण्याची आणि अशी घटना पुन्हा घडू नये याची काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत. या भागातील रुग्णालयांची व्यवस्थित काळजी घेतली जात नसल्याचा आरोप काँग्रेसचे स्थानिक आमदार प्रियंक खरगे यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करताना केला आहे. वाचा: पूर्वी गुलबर्गा म्हणून ओळखल्या जाणा-या कलबुर्गीमध्ये आतापर्यंत करोनाचे२ हजार ६७४ रुग्ण आढळले आहेत. देशात कोरोनामुळे झालेला पहिला मृत्यू कलबुर्गी येथेच झाला होता. शनिवारी कर्नाटकमध्ये कोरोनाच्या ४ हजार ५३७ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. ही एका दिवसातील सर्वाधिक रुग्णसंख्या होती. राज्यात कोरोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या, ५९ हजार ६५२ इतकी आहे. वाचा: ‘फक्त देवच आम्हाला वाचवू शकतो’, असे वक्तव्य कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी वाढत्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच केले होते. जगभरात कोरोनो विषाणूची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. आम्ही सर्व सतर्क असले पाहिजे. आपण सत्ताधारी पक्षाचे असोत किंवा विरोधी पक्षातील, श्रीमंत किंवा गरीब ... विषाणू भेदभाव करीत नाही, असेही श्रीरामुलू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना वादात सामना करावा लागला. मंत्रीपदाची टिप्पणी येडियुरप्पा सरकारच्या यांनी केली होती. ही वक्तवे सरकारची कोविड-१९च्या संकटाशी सामना करण्याची क्षमता नसल्याचे दर्शवतात, असे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने म्हटले आहे. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
July 20, 2020 at 11:10AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा