'या' आडनावामुळे महिलेला नाकारल्या नोकऱ्या; फेसबुकवर जाहीर केले दु:ख
N4U
१२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

गुवाहाटी: एखाद्या व्यक्तीला एखादी नोकरी न मिळण्याची अनेक कारणे आपल्याला माहीत आहेत. एकतर त्या व्यक्तीची शैक्षणिक पात्रता नसते, किंवा त्या व्यक्तीला आत्मविश्वास नसतो. तसेच त्या व्यक्ती नोकरी मिळवण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत विशेष कामगिरी केलेली नसते. इतकेच नाही, तर ती व्यक्ती कंपनीपासून फारच दूर राहत असेल... नोकरी नाकारण्याची अशी अनेक कारणे आपल्याला माहीत आहे. मात्र, नोकरीसाठी सतत प्रयत्न करणाऱ्या आसाममधील एका महिलेला नोकरी नाकारण्याचे वेगळेच कारण आहे. आसाममधील या महिलेला आपल्या आडनावामुळे नोकरी मिळण्यात मोठी अडचण येत आहे. आपल्या आडनावामुळे मी जेथे जेथे नोकरीसाठी अर्ज करते तेथे माझे अर्ज नाकारले जात असल्याचे या महिलेचे म्हणणे आहे. या महिलेवर कंपन्यांनी एक प्रकारे बहिष्काराचे अस्त्र उगारल्याचे स्पष्ट होत आहे. गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या या महिलेने नॅशनल सीड कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत नोकरीसाठी अर्ज केला होता. मात्र या अर्जात या महिलेचे Chutiya असे असल्याने कंपनीने या महिलेचा अर्ज नाकारला. आपला अर्ज स्वीकारला जावा यासाठी आपण भरपूर प्रयत्न केले. मात्र माझे कुणीच ऐकून घेतले नाही, असे महिलेने सांगितले. फेसबुकवर जाहीर केले दु:ख या महिलेने आपले हे दु:ख फेसबुकवर लोकांपुढे मांडले. मुलाखतीदरम्यान आपले आडनाव पाहून लोक हसत असत. आपल्या आडनावामुळे आपले अनेक नोकरीचे अर्ज नाकारले गेले, असे या महिलेने फेसबुकवर लिहिले. इतकेच नाही तर, सरकारी कंपन्यांनी देखील आपले अर्ज बाद केल्याचे या महिलेने फेसबुकवर लिहिले. वाचा: NACL ने मात्र स्वीकारला अर्ज सगळीकडे नोकरीसाठी केलेले अर्ज रद्द करण्यात आल्याचे पाहून ही खूपच खिन्न झाली. त्यानंतर तिने या बाबतची तक्रार एनएसीएलकडे केली. त्यानंतर या महिलेचा अर्ज स्वीकारला गेला. याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आसाम राज्यात आदिवासी समाजामध्ये Chitiya आणि Sutiya ही आडनावे आढळतात. अशा आडनावांचे लोक मोठ्या संख्येने आसामध्ये राहत आहेत. वाचा: वाचा:
https://ift.tt/3fcy07h
July 23, 2020 at 11:30AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा