N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

सरकारचे निर्णय अव्यवहार्य; चंद्रकांत पाटील यांची सरकारवर टीका

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

म. टा. प्रतिनिधी, : 'शेतक-यांच्या कर्जमाफीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच शेतक-यांना खरिपाच्या हंगामासाठी बँकांकडून कर्ज मिळत नाही,' असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांनी केला. खरिप हंगामाकरिता शेतक-यांना तातडीने कर्जपुरवठा व्हावा, या मागणीसाठी त्यांनी सोमवारी कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन दिले. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. वाचाः पावसाळा सुरू झाला तरी शेतक-यांना नवीन कर्ज मिळत नसल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत, असा आरोप करीत भाजपने सोमवारी राज्यभर शेतीचा कर्जपुरवठा सुरळीत सुरू व्हावा, या मागणीसाठी आंदोलन केले. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हाधिका-यांसह बँक ऑफ इंडियाच्या अधिका-यांना निवेदन दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'शेतक-यांना दोन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मोठ्या धडाक्यात मुख्यमंत्र्यांनी केली. नियमित कर्ज भरणाऱ्याना ५०,००० रुपये प्रोत्साहनपर रक्कम देऊ असं सांगितले. उपमुख्यमंत्र्यांनी तर तीन महिन्यात कर्जमाफी दिली नाही तर, नाव बदलवू अशी घोषणा केली. विधानसभेत बाके वाजली. अभिनंदन करून घेतले. प्रत्यक्षात मात्र या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. सरकारच्या अव्यवहार्य निर्णयांमुळेच त्याची अंमलबजावणी होत नाही. असं ते म्हणाले वाचाः 'गरज असताना शेतक-यांना कर्ज मिळत नाही. खरिप हंगाम सुरू होऊनही बँकांकडून कर्जपुरवठा होत नाही. सरकारने केलेल्या घोषणा पूर्ण झाल्या नाहीत. नैसर्गिक नुकसानीमध्ये कोरडवाहूला २५००० रुपये, तर फळबागांना ५०००० रुपयांची घोषणा सरकार विसरले. कोकणात आपत्तीग्रस्तांना तातडीची मदत पोहोचलीच नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलही घेतली नाही, ' असा आरोप आमदार पाटील यांनी केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, राहुल चिकोडे, भगवान काटे, आदी उपस्थित होते.


June 22, 2020 at 03:29PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा