N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

सात दिवसांत २१ रुग्ण; हायफाय मलबार हिलमधील 'ही' इमारत सील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

मुंबई: अवघ्या सात दिवसांत करोनाचे २१ हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानं परिसरातील नेपीयन्सी रोडवरील 'ताहनी हाइट्स' ही इमारत महापालिकेनं सील केली आहे. अधिक संसर्ग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. () Live: 'ताहनी हाइट्स' इमारतीतील विविध फ्लॅट्समध्ये घरकाम करणाऱ्या तब्बल १९ महिलांना करोनाची लागण झाली आहे. त्याशिवाय, ड्रायव्हर व सुरक्षा रक्षकांमध्येही करोनाची लक्षणे आढळली आहेत. घरकाम करणाऱ्या महिलांमुळं अनेक जणांना संसर्ग झाला असण्याची भीती व्यक्त होत आहे. संसर्गाची ही साखळी तोडण्यासाठी महापालिकेनं इमारत सील करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या 'डी' वॉर्डच्या सहाय्यक आयुक्तांनी तसं पत्रक प्रसिद्ध केलं आहे. करोनाबाधित आढळलेल्या सुमारे २१ जणांना क्वारंटाइन सेंटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. सोसायटीतील सार्वजनिक शौचालय दिवसातून चार ते सहा वेळा निर्जंतूक करण्याच्या सूचना संबंधितांना करण्यात आल्या आहेत. सोसायटीला त्यासाठी तयारी करेपर्यंत महापालिका हे निर्जंतुकीकरणाचे काम करणार आहे. सोसायटीतील सर्व रहिवाशांची तपासणी करण्यात आली असून नियमितपणे अशी तपासणी केली जावी, शा सूचना त्यांना दिल्या आहेत, असं महापालिकेच्या निवेदनात म्हटलं आहे. वाचा: मुंबईसह महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग वाढतच असून रोजच्या रोज ३ ते ४ हजारांपर्यंत नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातही मुंबईतील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मुंबई महापालिकेने आतापर्यंत हजारो इमारती सील केल्या आहेत. एखाद्या इमारतीत रुग्ण सापडल्यास खबरदारी म्हणून ती इमारत तात्काळ सील करण्यात येते. ठराविक कालावधीनंतर आढावा घेऊन किंवा नवा रुग्ण न आढळल्यास इमारतीतील रहिवाशांना मोकळीक दिली जाते. राज्यातील रुग्णांची संख्या १ लाख ३२ हजारांवर गेली आहे. त्यातील ६५,७४४ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ६०,१४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. वाचा:


June 22, 2020 at 05:17PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा