N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

Navi Mumbai: रुग्ण दगावल्याने डॉक्टर, नर्सला मारहाण; रुग्णालयात तोडफोड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी मुंबई: महापालिकेच्या येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला रुग्ण दगावल्याने नातेवाइकांनी रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिका यांना मारहाण केली. तसेच रुग्णालयात तोडफोडही केली. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. वाशी येथे रुग्णालयात बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. जुहू गावातील एका रुग्णाला उपचारासाठी वाशी येथील पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे रुगणाच्या नातेवाइकांनी संतप्त होऊन रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना शिवीगाळ करून मारहाणही केली. तसेच रुग्णालयात तोडफोड केली. यात रुग्णालयातील अनेक उपकरणांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांना याबाबत माहिती मिळताच, वाशी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन काही जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ift.tt/3fau8np
October 28, 2020 at 12:34PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा