malvi malhotra: बॉलिवूड अभिनेत्रीवर मुंबईत प्राणघातक हल्ला
N4U
२:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
![](https://maharashtratimes.com/photo/78887666/photo-78887666.jpg)
मुंबई: बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री () हिच्यावर मुंबईत प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात ती गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश असे हल्लेखोराचे नाव असून, त्याने स्वतःची निर्माता म्हणून ओळख करून दिली होती. वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, योगेशने मालवीवर चाकूने चार वार केले. रुग्णालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, तिची प्रकृती आता स्थिर आहे. अभिनेत्रीने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपी योगेश महिपाल सिंह याच्यासोबत फेसबुकद्वारे ओळख झाली होती. कामानिमित्त त्याला फक्त एकदाच भेटली होती. सोमवारी ती आपल्या घराबाहेर पडली. त्यावेळी हल्लेखोर कार घेऊन बाहेर थांबला होता. त्याने मालवीला भर रस्त्यात अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने विरोध केला. त्यावर त्याने तिच्यावर चाकूहल्ला केला. तिच्यावर चार वार केले. हल्ला केल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार झाला. मालवी मल्होत्रा हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी योगेशविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास सुरू केला आहे. पोलिसांना घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजमधून महत्वाचे पुरावे मिळाले आहेत. मूळची हिमाचल प्रदेशातील असलेल्या मालवी हिने काही बॉलिवूड चित्रपट आणि टीव्ही मालिकांमध्ये काम केलेले आहे.
https://ift.tt/3fau8np
October 27, 2020 at 01:03PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा