राष्ट्रीय एकता दिवस Live: पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना वाहिली श्रद्धांजली
N4U
१०:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज गुजरात दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असताना केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ यूनिटीजवळ जात सरदार पटेल यांना श्रद्धासुमने अर्पण केली. आज मोदी सिव्हील सर्व्हिसेस प्रोबेशनर्सना देखील संबोधित करतील. घेऊया, आजच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा Live अपडेट्स... >> आमच्या सर्वांसाठी सर्वोच्च हीत देशहीत आहे. सर्वांच्या हिताचा विचार केल्यानंतरच सर्वांची प्रगती आणि उन्नती होईल- मोदी >> देशाच्या हितासाठी, आमच्या सुरक्षादलांच्या मनोबलासाठी, कृपा करून असे राजकारण करू नका असे मी राजकीय पक्षांना आग्रह करेन. आपल्या स्वार्थासाठी नकळतपणे देशविरोधी शक्तीच्या हाती लागून तुन्ही ना देशाचे भले करू शकाल, ना स्वत:च्या आपल्या पक्षाचे- मोदी >> शेजारी देशाच्या संसदेने सत्य स्वीकारले आहे, त्यामुळे त्यांचा खरा चेहरा उघड झाला आहे. आपल्या राजकीय स्वार्थासाठी हे लोक कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतील, पुलवामा हल्ल्यानंतर केले गेलेले राजकारण हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे- मोदी >> त्या वेळी काय काय बोलले गेले हे देश विसरू शकणार नाही. देशावर इतका मोठा आघात झालेला असताना कशी वक्तव्ये दिली गेली हे देश विसरू शकणार नाही. तेव्हा स्वार्थ आणि अहंकाराने भरलेले घाणेरडे राजकारण शिखरावर होते- मोदी >> पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत मोदी भावुक झाले. मोदी म्हणाले- काही लोकांनी पुलवामा हल्ल्यात देखील राजकारणाची संधी शोधली. पुलवामावर राजकारण करणाऱ्यांना देश विसरणार नाही. त्यावेळी मी त्यांच्या घाणेरडी वक्तव्ये ऐकत राहिलो- मोदी >> राष्ट्रीय एकता दिवस: काही लोक दहशतवादाचे खुलेपणाने समर्थन करत आहेत, दहशतवाद-हिंसेने कोणाचेही कल्याण होऊ शकत नाही- मोदी >> स्टॅच्यू ऑफ यूनिटीमुळे केवडिया तेथे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या- मोदी >> आज सरदार सरोवर येथून ते साबरमती रिव्हर फ्रंटपर्यंत सी-प्लेन सेवेची सुरुवात होत आहे. सरदार साहेबांच्या दर्शनासाठी स्टॅच्यू ऑफ यूनिटीला पाहण्यासाठी आता देशातील जनतेला सी-प्लेनचा पर्याय देखील उपलब्ध होणार आहे. याने पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे- पंतप्रधान मोदी. >> स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथील आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांचे संबोधन सुरू >> नवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीचे उपराज्यपाल अनिल बैजल यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले. >> पाहा, 'राष्ट्रीय एकता दिवस' परेडची सलामी घेताना पंतप्रधान मोदी >> पाहा, सरदार पटेल याच्या'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'च्या प्रतिमेवर हॅलिकॉप्टरद्वारे आकाशातून फुले उधलली गेली >> पाहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे सरदार पटेल याना कसे केले अभिवादन... पाहा, केवडिया येथील राष्ट्रीय एकता दिवस परेड... >> सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात राष्ट्रीय एकता दिन साजरा होत आहे.
https://ift.tt/3fcy07h
October 31, 2020 at 09:19AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा