N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

हाथरस प्रकरण: अलाहाबाद हायकोर्ट CBI तपासावर देखरेख करणार; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: हाथरस प्रकरणाबाबत (Hathras gangrape and murder case) सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) आज महत्वाचा निर्णय दिला. या प्रकरणाचा (CBI) करत असलेला तपास हायकोर्टाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासानंतरच हा खटला उत्तर प्रदेशातून दिल्लीला वर्ग करायचा की नाही याबाबत कोर्ट निर्णय घेईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआय हायकोर्टाला जबाबदार असेल, असे कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा खटला दिल्लीत चालवला जावा असा अर्ज पीडित कुटुंबाने सुप्रीम कोर्टात केला होता. ( will monitor orders ) सरन्यायाधीश एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि न्यायमूर्ती रामासुब्रमणियव याच्या पीठाने एका जनहीत याचिकेवर, तसेच कार्यकर्ते आणि वकिलांनी दाखल केलेल्या इतर याचिकावरील आपला निर्णय सुप्रीम कोर्टाने १५ ऑक्टोबर या दिवशी राखून ठेवला होता. या प्रकरणावर उत्तर प्रदेशात निष्पक्ष सुनावणी होणे शक्य नाही कारण कथित रुपात हा तपासात ढवळाढवळ करण्यात आली आहे असे याचिकेत म्हटले आहे. क्लिक करा आणि वाचा बातमी- उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एका १९ वर्षीय दलित तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यात या तरुणीचा मृत्यू झाला. विरोध असतानाही पोलिसांनी या तरुणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या नंतर या प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिस प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडले आहेत. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-

https://ift.tt/3fcy07h
October 27, 2020 at 01:15PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा