N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

कुंथत कुंथत सरकार चालत नसतं; राज ठाकरेंची टोलेबाजी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: 'राज्यातले सगळेच प्रश्न अडकलेत. अकरावी प्रवेश खोळंबलाय. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, पण रेल्वे सुरू होत नाही. रेस्टॉरंट सुरू आहेत मंदिरं नाहीत. ही काय धरसोड सुरू आहे? कशासाठी कुंथताहेत? असं कुंथत कुंथत सरकार चालत नाही,' असा सणसणीत टोला मनसे अध्यक्ष यांनी आज हाणला. वाचा: सर्वसामान्य जनतेला आलेल्या वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी आज राज्यपाल यांची भेट घेतली. 'लोकांना भरमसाठ वीज बिले येताहेत. मनसे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करतेय. वीज बिले कमी करण्याची मागणी आम्ही केलीय. अदानी व बेस्टने हा मुद्दा वीज नियामक आयोगावर () ढकललाय. तर, कंपन्या आपला निर्णय घेऊ शकतात असं एमईआरसीनं म्हटलंय. लवकरच यावर निर्णय होईल असं सरकारचं म्हणणं आहे. पण तो होत नाही म्हणून आम्ही आज राज्यपालांना भेटलो. त्यांना या संदर्भात एक निवेदन दिलं आहे,' असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 'राज्यपालांनी पवार साहेबांशी बोलायला सांगितलं आहे. त्यांच्याशी आणि मुख्यमंत्र्यांशीही मी बोलणार आहे. मात्र हा विषय सरकारला माहीत आहे. 'ज्यांना पूर्वी दोन हजार रुपये बिल यायचं, त्यांना १० हजार बिल आलंय आणि ज्यांना ५ हजार रुपये बिल यायचं त्यांना २५ हजार आलंय. लोकांकडे रोजगार नाहीत. हाताला काम नाही. घरी पैसे येत नाहीत. अशावेळी ते बिल कसे भरणार? सरकारनं लवकरात लवकर यावर निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. राज्यपालांना सांगितलं हे खरं आहे, पण सरकार आणि राज्यपालांचं सख्य बघता हा विषय किती पुढं जाईल याबद्दल साशंकता आहे. किमान राज्यपाल हा विषय सरकारपुढं मांडतील,' अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली. वाचा:

https://ift.tt/3fau8np
October 29, 2020 at 12:32PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा