बिहार निवडणूक: मोदींचे सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे मतदारांना आवाहन
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
![](https://maharashtratimes.com/photo/78905144/photo-78905144.jpg)
नवी दिल्ली: बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या () पहिल्या टप्प्यातील मतदान आज बुधवारी होत आहे. बिहारच्या मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मतदारांना केले आहे. या बरोबरच करोनाचे संकट पाहता लोकांनी करोनाच्या गाइडलाइन्सची काळजी घेत मास्कचा वापर करावा. तसेच लोकांनी सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा, असे मोदींनी म्हटले आहे. करोनाच्या संकटकाळात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात निवडणूक होत आहे. ( reminds all of and use of ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी ट्विट करत म्हटले, 'बिहार विधानसभा निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. सर्व मतदारांनी कोविडसंदर्भातील सर्व ती काळजी घेत लोकशाहीच्या या पर्वात भाग घ्यावा आणि शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्कचा वापर जरूर करा. लक्षात ठेवा, पहले मतदान, फिर जलपान' आज बिहारमध्ये पंतप्रधान मोदींच्या सभा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बुधवारी उर्वरित टप्प्यातील मतदानासाठी बिहारमध्ये सभा घेत आहेत. आज पंतप्रधान मोदी बिहारमधील दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा येथे सभा घेत आहेत. क्लिक करा आणि वाचा- बिहार विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमधील १६ जिल्ह्यांमधील ७१ विधानसभा मतदारसंघात हे मतदान होत आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदान सुरू झाले आहे. या टप्प्यात एकूण १ हजार ६६ उमेदवारांसाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात दोन कोटी १४ लाख ८४ हजार ७८७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या १६ जिल्ह्यांमध्ये एकूण ३१ हजार ३८० मतदान केंद्रांवर ३१,३८०-३१,३८० सेट EVM आणि VVPAT ची व्यवस्था करण्यात आली आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
https://ift.tt/3fcy07h
October 28, 2020 at 10:43AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा