N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना करोना; होम आयसोलेशनचा सल्ला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
पणजी: गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM ) यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना होम आयसोलेशनचा () सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीच ही माहिती ट्विटद्वारे दिली. मी माझी सर्व कामे घरातूनच करणार असल्याचे प्रमोद सावंत यांनी म्हटले आहे. जे जे कोणी आपल्या संपर्कात आले असतील, त्या सर्वांनी आपल्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी, असा सल्लाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि फोंड्याचे काँग्रेसचे आमदार रवी नाईक यांना देखील गेल्या आठवड्यात करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांना देखील डॉक्टरांनी होम आयसोलेशनचा सल्ला दिला होता. तसेच, या पूर्वी कुंकळ्ळीचे आमदार क्लाफसियो डायस, आमदार सुदिन ढवळीकर, आमदार चर्चिल आलेमांव आणि उत्तर गोव्याचे खासदार आणि केंद्रीय मंत्री श्रापाद नाईक यांना देखील करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. श्रीपाद नाईक यांना मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर प्लाझ्मा थेरपी देखील करण्यात आली. तर, सुदिन ढवळीकरांवर देखील उपचार करण्यात आले. करोनाच्या सुरुवाताच्या टप्प्यात गोव्याने उत्तम प्रकारे करोनाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवले होते. मात्र नंतरच्या टप्प्यांमध्ये गोव्यातही करोनाचा संसर्ग पसरू लागला. अलिकडे देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोव्यातील वर्दळ वाढू लागली. तसेच गणेशोत्सवाच्या काळात अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्याची उदाहरणेही पुढे आली. अनेक ठिकाणी शारीरिक अंतराचा नियम धाब्यावर बसवण्यात आला. यानंतर गोव्यात रुग्णसंख्येत वाढ होत गेली. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, गोव्यात एकूण १७ हजार ४१८ जणांना करोनाची लागण झाली. त्यांपैकी एकूण १३ हजार ५७७ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर गोव्यात करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १९२ इतकी आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
September 02, 2020 at 11:14AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा