N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

विधानसभेत नॉट आउट ५० वर्षे ; 'हा' आमदार एकदाही हरला नाही निवडणूक!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
तिरुवनंतपुरम: केरळमधील काँग्रेसचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री (Oommen Chandy) आपल्या आमदार म्हणून कारकिर्दीची ५० वर्षे () पूर्ण केली आहेत. या पन्नास वर्षांच्या काळात ते सलग अकरावेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. असा विक्रम शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांच्या नावे आहे. सन २०१२ मध्ये आपल्या कारकिर्दीची ५० वर्षे पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधानसभा आणि सरकारने त्यांचा गौरव केला होता. चांडी यांचा गौरव करण्याची तयारी काँग्रेसने सुरू केली आहे. ( never lost any election since 1970) २० लाख कार्यकर्ते कार्यक्रमात घेणार भाग उम्मन चांडी यांचा भव्य ऑनलाइन सत्कार करण्याचा कार्यकम कोट्टयम जिल्हा काँग्रेसने केला आहे. हा व्हर्च्युअल कार्यक्रम १७ सप्टेंबरला संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम कोट्टयमच्या मम्मेन मप्पीलई हॉलमध्ये पार पडणार असून त्या ठिकाणी समाजातील विविध क्षेत्रातील ५० दिग्गज उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या कार्यक्रमाचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन करणार आहेत. काँग्रेस नेते शशी थरूर यांचे ट्विट- काँग्रेसचे उमेदवार असलेले उम्मन चांडी हे सन १९७० च्या केरळ विधानसभा निवडणुकीत ई. एम. जॉर्ज या सीपीएमच्या उमेदवाराचा ७, २८८ मतांनी पराभव करत विधानसभेत पोहोचले होते. नंतर ते सलपणे आतापर्यंतच्या सर्व निवडणुका जिंकत आले आहेत. सन २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी सीपीएमच्या जैक सी. थॉमस यांचा २७,०९२ मतांनी पराभव केला आहे. सन १९७७ मध्ये त्यांनी कामगार मंत्री म्हणून पदभार सांभाळला. त्यानंतर १९८१ मध्ये ते केरळ राज्याचे गृहमंत्री होते. तर सन ९१ मध्ये त्यांनी राज्याचे अर्थमंत्री म्हणून काम पाहिले. त्यानंतर ३१ ऑगस्ट २००४ मध्ये ते केरळचे मुख्यमंत्री बनले. पुढे १८ मे २०११ मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते केरळ विधानसभेचे विरोधी पक्षनेते देखील होते. क्लिक करा आणि वाचा- या कार्यक्रमात सोनिया गांधी यांच्याव्यतिरिक्त, राहुल गांधी, ए. के. अँटनी, आणि मुकुल वासनिक हे देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
September 08, 2020 at 01:33PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा