भाजपनं माझ्या अटकेचा खेळ रचलाय; शिवसेना आमदाराचा आरोप
N4U
१२:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
ठाणे: 'भारतीय जनता पक्षाने राष्ट्रीय महिला आयोगाला हाताशी धरून माझ्या अटकेचा खेळ रचला आहे. पण लक्षात ठेवा, मुंबई आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी मला कितीही वेळा तुरुंगात जावे लागले तरी तयार आहे,' असं शिवसेनेचे आमदार यांनी ठणकावलं आहे. हिनं मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. कंगनाला मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर तिनं चंबूगबाळं आवरून आपल्या राज्यात निघून जावं, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुनावलं होतं. त्यावर, प्रतिक्रिया देताना मी ९ तारखेला मुंबईत येणार आहे. कोणाच्या बापाची हिंमत असेल तर अडवून दाखवा, असं आव्हान कंगनानं दिलं होतं. तिच्या या वक्तव्यामुळं आगीत तेल ओतलं गेलं. शिवसैनिक रस्त्यावर आले. वाचा: आमदार प्रताप सरनाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. कंगनाला संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलिब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे,' असं सरनाईक म्हणाले होते. तो मुद्दा उचलून धर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनी सरनाईक यांच्या वक्तव्याची स्वत:हून दखल घेऊन त्यांना अटक करावी, अशी मागणी केली होती. महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना त्यांनी तसं पत्रही लिहिलं आहे. वाचा: राष्ट्रीय महिला आयोगाच्या या भूमिकेमुळं सरनाईक भडकले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या या तत्परतेमागे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'महिला आयोगाला हाताशी धरून भाजपनं मला अटक करण्याचा खेळ रचला आहे. पण मुंबई व महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी कितीही वेळा तुरुंगात जायला मी तयार आहे,' असं त्यांनी म्हटलंय. 'मी माझ्या विधानावर ठाम आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत १०६ वीरांनी पत्करलेल्या हौतात्म्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसानं रक्त सांडून मिळवलेल्या मुंबईबद्दल कोणीही काहीही बोलेल तर खपवून घेणार नाही,' असंही त्यांनी ठणकावलं आहे.
https://ift.tt/3fau8np
September 05, 2020 at 11:35AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा