अयोध्येनंतर काशी-मथुरेला करायचंय 'मुक्त', साधुंच्या बैठकी
N4U
२:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
प्रयागराज : अयोध्येत राम मंदिर निर्माणाच्या कामाला सुरुवात झालीय. आता आणि विश्वानाथ मंदिर परिसराला 'मुक्त' करण्याची भूमिका अखिल भारतीय आखाडा परिषदेनं घेतलीय. यासाठी प्रयागराजमध्ये सोमवारी सकाळी ११.०० वाजता श्रीमठ वाघंम्बरी गादीवर बैठकही घेण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षपद अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष यांनी सांभाळलं. बैठकीत सर्व १३ आखाड्यांचे पदाधिकारी उपस्थित राहिले. साधु-संतांची सर्वोच्च संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'अखिल भारतीय आखाडा परिषदे'ला आता काशी आणि मथुरेला 'मुक्त' करायचंय. काशी विश्वनाथ मंदिर परिसरात असलेल्या ज्ञानवापी 'मशिद' हटवण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेनं ही बैठक बोलावली आहे. या बैठकीत दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या माघ जत्रा आणि प्रयागराज परिक्रमा मार्गाच्या मुद्यावरही चर्चा होणार आहे. वाचा : वाचा : मुघलांनी काशी विश्वनाथ मंदिरात मंदिरावर ज्ञानवापी मशिदीचं निर्माण केलं होतं. आज इथं होणाऱ्या खोदकामा दरम्यान सुरुंग आणि मंदिराचे इतर अवशेष आढळत आहेत. यावरून हे स्पष्ट होतं की इथं मंदिर आहे. रामजन्मभूमीनंतर आता कृष्ण जन्मभूमी आणि काशी विश्वनाथ मंदिराला मुक्त करण्याची वेळ आलीय, असं आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांनी म्हटलंय. २०२१ मध्ये प्रयागराजमध्ये संगमच्या रेतीवर माघ जत्रेचं आयोजन केलं जातं. परंतु, करोनामुळे या आयोजनाच्या तयारीवरही परिणाम होत आसल्याचं नरेंद्र गिरी यांनी म्हटलंय. आखाडा परिषदेच्या या बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाईडलाइन्स तसंच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करण्यात येत असल्याचंही गिरी यांनी म्हटलंय. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
September 07, 2020 at 01:03PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा