N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

करोनाचा उद्रेक: 'या' बाबतीत भारत जगात अव्वलस्थानी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: विषाणूने (Corona Virus) जगात थैमान घातल्यानंतर आता भारतात कहर सुरू आहे. विशेष म्हणजे ऑगस्ट महिन्यात सुमारे २० लाख लोकांन करोनाची लागण झाली आहे. जगातील कोणत्याही देशात महिन्याभरात वाढलेल्या करोनारुग्णांच्या संख्येहून ही संख्या सर्वात मोठी आहे. इतकेच नाही, तर या दरम्यान २८ हजार ८५९ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. म्हणजेच गेल्या जुलै महिन्याच्या तुलनेत ही संख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक आहे. (india sets a new global record) भारतात ऑगस्ट महिन्यात ३१ दिवसांमध्ये १९ लाख ८७ हजार ७०५ करोना रुग्ण आढळले. याबरोबरच अमेरिकेत जुलै महिन्यात १९ लाख ४ हजार ४६२ रुग्ण आढळले होते. हा विक्रम भारताने तोडला आहे. एखाद्या महिन्यात जगात सर्वाधिक करोना रुग्ण वाढल्याचा विक्रम भारताच्या नावे नमूद आहे. मृत्यूचा विचार करता अमेरिका आणि ब्राझील हे ऑगस्ट महिन्यात सर्वात पुढे आहेत. अमेरिकेत करोनामुळे एकूण ३१ हजार लोकांचा मृत्यू झाला, तर ब्राझीलमध्ये २९ हजार ५६५ जणांचा मृत्यू झाला आहे. भारत तिसऱ्या स्थानी आहे. मात्र ही संख्या सकारात्मक असल्याचे दिसत नाही. करोनाच्या संसर्गाला लगाम न घातल्यास येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये स्थिती आणखी भयावह होऊ शकते. ३६ लाखांच्याही पुढे रुग्णांची संख्या एकूण आकडेवारीवार नजर टाकली असता भारतात ३६ लाख ९१ हजार रुग्ण आहेत. तर यात दिलासा देणारी बाब म्हणजे एकूण रुग्णांपैकी २८ लाख ३९ हजार ८८३ रुग्ण बरे झाले आहेत. तर देशात एकूण ७ लाख ८५ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही सक्रिय रुग्णांची संख्या आहे. सक्रिय रुग्णांचा विचार करता फक्त अमेरिकाच भारताच्या पुढे आहे. अमेरिकेत सक्रिय रुग्णांची संख्या २५ लाख ६ हजार इतकी आहे. तर मृत्यूंचा विचार करता भारत जगात तिसऱ्या स्थानी आहे. अमेरिकेत १ लाख ८७ हजार, ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ लाख २ हजार आणि भारतात ही संख्या ६५ हजार २८८ इतकी आहे. क्लिक करा आणि पाहा आज रुग्णसंख्येत सोमवारच्या तुलनेत काहीशी वाढ सोमवारी ६५ हजार ९६८ नवे रुग्ण वाढले. ही संख्या गेल्या आठवडाभरात वाढलेल्या रुग्णांचा विचार करता दिवसातील सर्वात कमी वाढ होती. आज मंगळवारी एकूण ६९ हजार ९२१ रुग्ण वाढले. २४ तासांत एकूण ८१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही संख्या मात्र ३ ऑगस्टनंतर सर्वात कमी संख्या आहे. सोमवारी ही संख्या ८२४ इतकी होती. रविवारी एकूण ८० हजार रुग्ण वाढले होते. आजची संख्या पाहता ही त्यातल्या त्यात एक दिलासा देणारी बाब आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

https://ift.tt/3fcy07h
September 01, 2020 at 10:22AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा