शिवसेना खासदार हेमंत गोडसेंना करोना; तीन दिवसांपूर्वीच गडकरींना भेटले
N4U
१०:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नाशिक: नाशिकमधील शिवसेनेचे खासदार यांना करोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन केलं आहे. तसेच आपल्या संपर्कात आलेल्यांनी आपली करोना टेस्ट करून घ्यावी, असं आवाहन हेमंत गोडसे यांनी केलं आहे. दोन दिवसांपासून करोनाची लक्षणं जाणवू लागल्याने खासदार हेमंत गोडसे यांनी त्यांची करोना चाचणी केली होती. काल रात्री या चाचणीचा अहवाल आला असून त्यात हेमंत गोडसे यांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. गोडसे यांनी ट्विटरवरूनही त्याची माहिती दिली आहे. माझ्या करोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. मागील काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी व सहकाऱ्यांनी काळजी म्हणून वैद्यकीय सल्ल्याने गरज असल्यास स्वतःची करोना चाचणी करावी. मी यथाशक्य माझ्या ठिकाणाहून आपली सेवा सुरू ठेवेन व करोना परिस्थितीचा आढावा घेत राहीन, असं गोडसे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गोडसे यांनी स्वत:ला होम क्वॉरंटाइन करून घेतलं आहे. गोडसे तीन दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय परिवहन मंत्री यांना भेटले होते. नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबत त्यांनी गडकरींशी चर्चा केली होती. गडकरींसह ते इतर अधिकाऱ्यांनाही भेटले होते. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत चार आमदारांना करोनाची लागण झालेली असतानाच आता खासदारांनाही करोनाची लागण झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नाशिक महापालिकेने करोना नियंत्रणासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासोबतच करोनाचा सर्वाधिक धोका असलेल्या कोमॉर्बिड रुग्णांना करोनापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी महापालिकेने रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग आदी व्याधींनी ग्रस्त (कोमॉर्बिड) रुग्णांचे सर्वेक्षण केले असून, आतापर्यंत १२ लाख नागरिकांच्या सर्वेक्षणात ३३ हजार ७८५ कोमॉर्बिड रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना करोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क ठेवून त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. शहरातील १८ लाख ८७ हजार ३७८ लोकसंख्येपैकी आतापर्यंत १२ लाख २६ हजार ८७२ लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यात एकूण ३३ हजार ७८५ जण कोमॉर्बिड अर्थात विविध व्याधींनी ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. उर्वरित लोकांचेही सर्वेक्षण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोमॉर्बीड सर्वेक्षणाची गती कमी झाल्यामुळे आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली असून सर्वेक्षणाची गती वाढविण्याचे निर्देश आरोग्य-वैद्यकीय विभागाला देण्यात आले आहेत. ३१ ऑस्टपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे व त्यानंतर आवश्यक ती पुढील उपाययोजना करण्याचे आयुक्तांचे निर्देश आहेत.
https://ift.tt/3fau8np
September 01, 2020 at 09:14AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा