N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

भारतीय जवानांचा चीनला आणखी एक झटका, 'ब्लॅक टॉप'वर नियंत्रण!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : स्थित पॅन्गाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्याजवळच्या प्रमुख टेकड्यांवर भारतीय सेनेनं वर्चस्व मिळवल्यानंतर इंडो तिबेट सीमा पोलीस () दलाच्या जवानांनी चीनला आणखी एक धक्का दिलाय. आयटीबीपीच्या ३० जवानांनी रणनीतीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण अशा ब्लॅक टॉप परिसराजवळ नव्या जागेवर आघाडी मिळवलीय. भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे स्थान अत्यंत महत्त्वाचं ठरतं. त्याचं कारण म्हणजे पूर्व लडाख भागात वास्तविक नियंत्रण रेषेवर (LAC) तैनात असलेल्या चिनी सैनिकांच्या हालचालींवर या ठिकाणावरून आयटीबीपी जवान सहज लक्ष ठेवू शकतात. 'द टाईम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, आयटीबीपी जवान 'फुरचुक ला'हून पुढे सरकत ब्लॅक टॉपपर्यंत पोहचले. फुरचुक ला ४९९४ मीटर उंचावर आहे. आत्तापर्यंत आयटीबीपीचे जवान केवळ पॅन्गाँग सरोवराच्या उत्तर किनाऱ्यावर स्थित फिंगर २ आणि फिंगर ३ भागाजवळच्या 'धान सिंह पोस्ट'पर्यंतच तैनात केले जात असत. वाचा : वाचा : आयटीबीपीचे आयईजी (ऑपरेशन्स) एम एस राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'आयटीबीपीचे डीजीपी एस एस देसवाल यांनी गेल्या आठवड्यात जवानांसोबत इथंच सीमेवर ठाण मांडलं होतं. त्यांच्यासोबत आयजी (पर्सोनल) दलजीत चौधरी आणि आयजी (लेह) दीपम हेदेखील उपस्थित होते. त्यांनी जवानांना आणखी सतर्क राहण्याचे निर्देश दिले. पहिल्यांदाच आपण या भागातील टेकड्यांवर मोठ्या संख्येत उपस्थित आहोत' दरम्यान, पूर्व लडाखमधील चीन सीमेवरील परिस्थिती थोडी नाजूक आणि गंभीर असल्याचं लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शुक्रवारी म्हटलंय. मात्र, लष्कराने उचललेल्या खबरदारीच्या पावलांमुळे ही परिस्थिती निवळण्यास मदत होईल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केलाय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषवरील तणावपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख जनरल नरवणे गुरुवारी लेहमध्ये, तर शुक्रवारी लडाखमध्ये दाखल झाले होते. सध्या हेल्मेट टॉप, ब्लॅक टॉप, येलो बंप वर आर्मी, आयटीबीपी आणि स्पेशल फ्रंटियर फोर्स (SFF) नं वर्चस्व मिळवलंय. या जागेवरून थेट चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या दक्षिणेकडील पोस्ट क्रमांक ४२८०, डिगिंग एरिया आणि चुती चामला या ठिकाणच्या हालचाली स्पष्टपणे दिसू शकतात, असा दावा केला जातोय. आयटीबीपीनं वास्तविक नियंत्रण रेषेजवळ आत्तापर्यंत ३९ हून अधिक जागांवर वर्चस्व मिळवलंय. आयटीबीपीचे जवान चुशूल आणि तारा बॉर्डर आऊटपोस्टजवळ तैनात आहेत. चंदीगडहून अतिरिक्त कंपन्या एअरलिफ्ट करण्यात आल्याची माहिती आयटीबीपी अधिकाऱ्यांनी दिलीय. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
September 05, 2020 at 09:17AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा