'तबलिघी जमात' ठरली 'बळीचा बकरा', FIR रद्द करण्याचे कोर्टाचे आदेश
N4U
४:१६ PM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली : मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिल्लीतील प्रकरणातील तबलिघी जमातच्या () देश आणि परदेशातील तबलिघींविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द केले आहेत. करोना काळात तबलिघी जमातीला '' बनवण्यात आल्याचं निरीक्षणही न्यायालयानं यावेळी नोंदवलंय. सोबतच चुकीचं वार्तांकन करणाऱ्या मीडियाला फटकारताना, या लोकांना फैलावलेल्या संक्रमणासाठी आरोपी ठरवण्याचा प्रोपोगंडा चालवण्यात आल्याचंही न्यायालयानं म्हटलंय. कोर्टाच्या या निर्णयानंतर यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 'या प्रोपोगंडाच्या सहाय्याने मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं शिकार व्हावं लागलं' असं ओवैसी यांनी म्हटलंय. शनिवारी न्यायालयात या प्रकरणाची सुनाावणी झाली. यावेळी, 'दिल्लीच्या मरकझमध्ये आलेल्या परदेशी लोकांविरुद्ध प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा प्रोपोगंडा चालवण्यात आला. भारतात फैलावणाऱ्या कोविड १९ संक्रमणाचा जबाबदार हे परदेशी लोक आहेत, अशी वातावरण निर्मिती करण्यात आली. तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं' असं न्यायालयानं म्हटलंय. 'याचिकाकर्त्यांच्या विरोधात अशा पद्धतीची कारवाई व्हायलाच नको होती, असं भारतातील सद्य संक्रमणाच्या आकडेवारीवरून दिसतंय. त्यावर पश्चाताप करण्याची आणि नुकसान भरपाईसाठी सकारात्मक पाऊल उचलणं गरजेचं आहे' असंही खंडपीठानं म्हटलंय. संबंधित बातम्या : वाचा : वाचा : वाचा : वाचा : न्यायालयाच्या या निर्णयानंतर हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. 'योग्य वेळेवर योग्य निर्णय' असं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. 'भाजपला वाचवण्यासाठी मोठ्या जबाबदारीनं मीडियानं तबलिघी जमातीला बळीचा बकरा बनवण्यात आलं. या संपूर्ण प्रोपोगंड्यानं देशभरातील मुस्लिमांना द्वेष आणि हिंसेचं शिकार व्हावं लागलं' इतर बातम्या : वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
August 22, 2020 at 02:53PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा