N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

झारखंड मुख्यमंत्र्यांचे ७६ वर्षीय वडील शिबू सोरेन करोना संक्रमित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
रांची : झारखंड मुक्ती मोर्चाचे (JMM) अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्या करोना संक्रमित असल्याचं समोर आलंय. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी यांचीही पॉझिटिव्ह आलीय. दोघांना आयसोलेट करण्यात आलंय. यासोबतच शिबू सोरेन यांचे पुत्र आणि राज्याचे मुख्यमंत्री यांची पुन्हा एकदा करोना चाचणी घेण्यात येणार आहे. सोमवारी २४ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची करोना चाचणी होईल. यापूर्वी माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या घरी तैनात असणारे १७ स्टाफ सदस्य आणि सुरक्षा रक्षक सापडले होते. त्यानंतर शिबू सोरेन आणि त्यांच्या पत्नी रुपी सोरेन यांची करोना चाचणी करण्यात आली. यात त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. शिबू सोरेन हे ७६ वर्षांचे आहेत. त्यामुळे करोना संक्रमणाच्या पुष्टीनंतर त्यांच्या आरोग्याकडे डॉक्टरांचा लक्ष आहे. वाचा : वाचा : पिती - पुत्र असलेल्या शिबू सोरेन आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं निवासस्थान वेगवेगळं आहे. परंतु, खबरदारी म्हणून मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचीही करोना चाचणी केली जाणार आहे. सोमवारी त्यांची करोना चाचणी होईल. यापूर्वीही मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची एकदा करोना चाचणी करण्यात आली होती. या चाचणीत ते करोना निगेटिव्ह आढळले होते. यापूर्वी, झारखंडचे कॅबिनेट मंत्री बन्ना गुप्ता करोना पॉझिटिव्ह आढळले होते. बन्ना गुप्ता यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभाग घेतला होता. या बैठकीला मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यासहीत अनेक मंत्री उपस्थित होते. त्यामुळे बन्ना गुप्ता करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या मंत्र्यांचीही करोना चाचणी करण्यात आली होती. वाचा : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
August 22, 2020 at 12:46PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा