करोनाचा कहर वाढला; तीन डॉक्टरांच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
N4U
४:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नागपूर: राज्यातील करोनाचा कहर काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी दिवसभरात करोनामुळे राज्यात तीन झाल्याने खळबळ उडाली आहे. अकोला, बुलडाणा आणि भुसावळमध्ये शुक्रवारी तीन बालरोग तज्ज्ञांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. अकोला जिल्ह्यातील डॉक्टर विवेक फडके (५५) हे गेल्या पाच महिन्यांपासून मुर्तिजापूर कोविड केअर सेंटरमध्ये आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत होते. करोनाची लागण झाल्याने त्यांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले असता ४४ तासांतच त्यांचा मृत्यू झाला. तर बुलडाणा जिल्ह्यातील एका खासगी रुग्णालयात काम करणारे डॉक्टर गोपाळ क्षीरसागर (३७) यांचंही करोनामुळे निधन झालं आहे. जानेफळ येथे त्यांचं खासगी रुग्णालय होतं. करोनाची लागण झाल्याने त्यांना ५ ऑगस्ट रोजी औरंगाबादच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भुसावळमध्ये गरीबांचा डॉक्टर म्हणून ख्याती असलेले सुप्रसिद्ध डॉक्टर उमेश मनोहर खानापुरकर यांचाही करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनाची लागण झाल्याने ११ ऑगस्ट रोजी त्यांनी मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या तिन्ही डॉक्टरांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, राज्यात शनिवारी ११ हजार ५४१ रुग्ण बरे झाले तर १६ हजार ८६७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७२.५८ टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ५ लाख ५४ हजार ७११ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १ लाख ८५ हजार १३१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. शनिवारी निदान झालेले १६,८६७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ३२८ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मनपा-१४३२ (३१), ठाणे- २४६ (७), मनपा-२१९ (१३), नवी मुंबई मनपा-४०६ (९), कल्याण डोंबिवली मनपा-३५५, उल्हासनगर मनपा-३९, भिवंडी निजामपूर मनपा-१६, मीरा भाईंदर मनपा-१७१ (९), पालघर-१३५ (१), वसई-विरार मनपा-१६५ (६), रायगड-३५१ (२१),पनवेल मनपा-२७०, नाशिक-३१० (५), नाशिक मनपा-७९६ (११), मालेगाव मनपा-५६, अहमदनगर-३५४ (४),अहमदनगर मनपा-२९० (४), धुळे-७५ (२), धुळे मनपा-११८ (१), जळगाव- ६९३ (१६), जळगाव मनपा-१८६ (४), नंदूरबार-६० (१), पुणे- ९५८ (११), मनपा-१९७२ (३२), पिंपरी चिंचवड मनपा-११३२ (४), सोलापूर-४५५ (८), सोलापूर मनपा-५५ (१), सातारा-७२० (६), कोल्हापूर-४३५ (१२), कोल्हापूर मनपा-२३४ (३), सांगली-२६८ (१२), सांगली मिरज कुपवाड मनपा-२५१ (११), सिंधुदूर्ग-३२, रत्नागिरी-७४ (३), औरंगाबाद-९७ (१),औरंगाबाद मनपा-२४६ (२), जालना-७२ (२), हिंगोली-४८ (१), परभणी-३३, परभणी मनपा-४५ (१), लातूर-९९ (५), लातूर मनपा-९३ (३), उस्मानाबाद-१६७ (३),बीड-१०६ (६), नांदेड-२०१ (९), नांदेड मनपा-१०० (६), अकोला-३४, अकोला मनपा-१३ (१), अमरावती-१०१, अमरावती मनपा-२८ (४) , यवतमाळ-११८, बुलढाणा-११० (१), वाशिम-३३ , नागपूर-३३१ (४), नागपूर मनपा-१०७० (२७), वर्धा-५५ (१), भंडारा-५८, गोंदिया-९७ (१), चंद्रपूर-८७ (१), चंद्रपूर मनपा-६५ (१), गडचिरोली-१२, इतर राज्य १९. वाचा:
https://ift.tt/3fau8np
August 30, 2020 at 08:56AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा