N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

'देश 'काँग्रेसमुक्त' झाला नाही म्हणून भाजपने रचला 'हा' डाव'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
मुंबई: काँग्रेसच्या अध्यपदावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते, खासदार यांनी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांसह भाजपवर आसूड ओढला आहे. पंतप्रधान यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा रुग्णालयात असताना फक्त पत्र पाठवूनच काँग्रेसचे २३ नेते थांबले नाहीत, तर त्यानंतर आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली अशी विचारणा करणारी दोन ‘रिमाइंडर्स’ म्हणजे स्मरणपत्रे पाठवली. हे जरा अतिच झाले. या पत्रांमुळे सोनिया गांधी वैतागून काँग्रेसचे अध्यक्षपद सोडतील व आता तुम्हीच काँग्रेस सांभाळा असे सांगतील असा या ‘पत्रलेखक’ नेत्यांचा डाव होता. तो राहुल गांधी यांनी उधळून लावला आहे. सोनिया गांधी काँग्रेस अध्यक्षपद सोडतील व त्यानंतर सामुदायिक नेतृत्व म्हणून हे ‘पत्रलेखक’ काँग्रेसवर ताबा मिळवतील हे सर्व भाजपला हवेच होते. पंतप्रधान मोदी यांचे मूळ स्वप्न देश काँग्रेसमुक्त करण्याचेच होते. ते पूर्ण झाले नाही. तेव्हा काँग्रेस गांधी परिवारमुक्त करण्यासाठी काँग्रेसच्याच काही नेत्यांना भाजप आणि कॉर्पोरेट उद्योगपतींनी हाताशी धरले, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांनी दैनिक 'सामना'तील 'रोखठोक' या सदरामधून भाजपवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी हे सतत सरकारच्या व्यवहारांवर टीका करीत आहेत. अनेक उद्योगपतींना मोदींचे सरकार नियमबाह्य पद्धतीने लाभ पोहोचवीत असल्याचे आरोप ते करीत आहेत. यामुळे अस्वस्थ झालेल्या ‘कॉर्पोरेट’ लॉबीनेच काँग्रेस गांधीमुक्त करण्याचा विडा उचलला. सोनिया, प्रियांका, राहुल यांनी काँग्रेसच्या सक्रिय कार्यातून दूर व्हावे व ‘मार्गदर्शक’ मंडळाचे सभासद म्हणून काम करावे असे या सर्व मंडळींचे डावपेच होते. ते सफल झाले नाहीत, असे काँग्रेसमधील मोठ्या गटाचे म्हणणे आहे, असा दावाही त्यांनी केला आहे. राऊत काय म्हणतात... >> गांधी घराण्याबाहेरची व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी यावी हा विचार चांगला आहे. पण त्या लायकीची आणि ताकदीची व्यक्ती काँग्रेस पक्षात आज उरली आहे? ज्या २३ काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिले त्यातील एकही नेता काँग्रेसचे अध्यक्षपद भूषवू शकेल अशा कुवतीचा नाही. >> काँग्रेससाठी गांधी परिवाराने रक्ताचे सिंचन केलेच आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर नरसिंह राव हे पंतप्रधान व काँग्रेसचे अध्यक्षही झाले. सीताराम केसरी हेसुद्धा गांधी परिवाराबाहेरचेच अध्यक्ष होते. संघटना त्यांच्या काळात रसातळाला गेली. सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्यावर पुन्हा काँग्रेसने उभारी घेतली. मनमोहन सिंग यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले ते त्यामुळेच. परदेशी सोनिया गांधींना काय कळते? त्या काय करू शकतील? असे प्रश्न तेव्हा सगळ्यांनाच पडले होते. ते सर्व प्रश्न नंतर निकाली निघाले. >> काँग्रेस पक्ष आज दिशाहीन आणि नेतृत्वहीन झाला. त्यास जबाबदार कोणी असले तरी ज्वलंत हिंदुत्वाने बेगडी धर्मनिरपेक्षतेवर केलेली मात हेच त्यामागचे खरे कारण आहे. देशातील बहुसंख्य समाजाच्या भावना सतत डावलून, अल्पसंख्याक म्हणून फक्त मुसलमानांचेच लांगूलचालन करणे हे धोरण काँग्रेसच्या मुळावर आले. पुन्हा उत्तरेतील मुसलमान आणि दलितही काँग्रेसकडे राहिले नाहीत. >> भाजप, मुलायम, मायावती, शिवसेना यांनी जशी स्वतःची व्होट बँक निर्माण केली आहे तशी ती आज काँग्रेसकडे राहिलेली नाही व फक्त नरेंद्र मोदी, संघ परिवार यावर हल्ले करूनही मतांचा टक्का वाढणार नाही. राजकारणातून धर्मनिरपेक्षतेचे त्रांगडे संपले आहे व भाजप-शिवसेनेसारख्या पक्षांना मुसलमान मतदान करत आहेत हे समजून घेतले पाहिजे. मोदी यांना आज सगळ्याच जातीधर्मांचे मतदान होते. >> महाराष्ट्रात काँग्रेस शिवसेनेबरोबर सत्तेत सहभागी आहे याची खदखद काही काँग्रेसजनांच्या मनात आहे. शिवसेनेसोबत गेल्याने काँग्रेसच्या ‘आयडॉलॉजी’चे काय, असा प्रश्न जे आजही उपस्थित करतात त्यांना काँग्रेसला नवसंजीवनी द्यायची नाही व नवे नेतृत्व निर्माण होऊ द्यायचे नाही. >> राज्याराज्यांत काँग्रेस आहे, फक्त मूळ चेहऱ्यावरचे मुखवटे बदलले आहेत. या सगळ्यांनी मुखवटे काढून फेकले तरी देशात काँग्रेस एक प्रबळ पक्ष म्हणून उभारी घेईल. तरुण वर्गाला आज काँग्रेसचे आकर्षण का वाटत नाही याचे मंथन सोनिया गांधी यांना पत्र लिहिणाऱ्या २३ नेत्यांनी करायलाच हवे. काँग्रेस पक्ष ही कधीही न मरणारी म्हातारी आहे, असे वर्णन एकदा बॅ. विठ्ठलराव गाडगीळ यांनी केले होते. म्हातारीचे काय करायचे हे राहुल गांधींनीच ठरवायला हवे!

https://ift.tt/3fau8np
August 30, 2020 at 11:58AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा