N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

करोनावर 'या' महिन्यात नियंत्रण येईल?; आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: देशभरात करोनाचा () संसर्ग तीव्र गतीने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्री ( dr harsh vardhan) यांनी अशात दिलासा देणारे वृत्त दिले आहे. दिवाळीपर्यंत आपण या साथीच्या आजारावर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ, अशी आशा डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये करोनावर आपण नियंत्रण मिळवू शकू, मात्र दिवाळीपर्यंत देखील आपण मोठ्या प्रमाणावर हा आजार नियंत्रणात आणू, असे आरोग्यमंत्री म्हणाले. ( will be under control by ) अनंतकुमार फाउंडेशनने आयोजित केलेल्या 'नेशन फर्स्ट' वेब सेमिनारमध्ये डॉ. हर्षवर्धन बोलत होते. काही दिवसांनंतर हा आजार इतर साथीच्या आजाराप्रमाणे एक स्थानिक साथीचा आजार उरेल आणि याच्याशी डॉक्टर देवी प्रसाद शेट्टी आणि डॉक्टर सी. एन. मंजूनाथ यांच्या सारखे विशेषज्ञ देखील सहमत होतील, असे आरोग्यमंत्री म्हणाले. या करोना विषाणूने आम्हाला विशेष गोष्टी शिकवल्या आहेत. आता काही नवे होईल, स्थिती सामान्य होईल आणि आम्हाला या पुढील काळात आपल्या जीवनशैलीबाबत अधिक सावध राहावे लागेल अधिक काळजी घ्यावी लागेल, असे डॉ. हर्षवर्धन पुढे म्हणाले. या वर्षाच्या शेवटपर्यंत करोना विषाणूवर लस येईल, असा विश्वासही डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केला. क्लिक करा आणि वाचा- दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या ६५ हजारांच्या आसपास पोहोचली आहे. तसेच देशभरातील करोनाची लागण झालेल्या बाधितांची एकूण संख्या ३६ लाख, १६ हजार ७३० वर पोहोचली आहे. तसेच २७ लाख ६७ हजार ४१२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर, आतापर्यंत देशात असलेल्या एकूण सक्रिय रुग्णांची सख्या ८ लाखांच्या (७,८४,७६८) आसपास पोहोचली आहे. क्लिक करा आणि पाहा क्लिक करा आणि पाहा-

https://ift.tt/3fcy07h
August 31, 2020 at 09:32AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा