N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

Rajasthan Political Crisis: गहलोत यांची 'ही' घोषणा; सचिन पायलट यांच्या अडचणी वाढणार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली: राजकारणातील जादूगार म्हणून ओळखले जाणारे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत ( CM Ashok Gehlot) यांनी लवकरच आपण विधानसभेचे अधिवेशन बोलावणार असल्याचे जाहीर केले आहे. खरे तर , राजस्थानच्या राजकारणातील सध्याची स्थिती लक्षात घेता मुख्यमंत्री गेहलोत यांची ही घोषणा सर्वसाधारण असल्याचे म्हणता येणार नसल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. गुरुवारी राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतल्यानंतर गहलोत यांनी विधानसभेचे अधिवेशन बोलावणार असल्याचे प्रसार माध्यमांना सांगितले. या बरोबरच , आपल्याकडे बहुमत असून आपण सभागृहात ते सिद्ध करू असेही गहलोत यांनी स्पष्ट केले आहे. (ashok gehlot decided to call assembly session) राज्यपालांसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी अधिवेशन बोलावण्यावर चर्चा केली असली तरी देखील लिखित स्वरुपात यावर काहीही केलेले नाही. त्याचबरोबर, कायदेशीर लढाईच्या पहिल्या टप्प्यात सचिन पायलट आणि त्यांच्या समर्थकांना दिलासा मिळाला आहे. पण गहलोत यांचा नवा राजकीय डाव सचिन पायलट यांच्यासाठी खूप कठीण असल्याचे सिद्ध होत आहे. मुख्यमंत्री गहलोत यांनी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. सचिन पायलट यांना हायकोर्टाकडून विधानसभा सदस्य म्हणून दिलासा मिळाला असली तरी त्याला पक्षाच्या व्हीपचे पालन करावे लागेल. तसेच विधानसभेच्या कामकाजात भाग घ्यावा लागेल. मुख्यमंत्री अशोक गहलोत हे विधानसभेत विश्वासदर्शक ठारावाचा निर्णय घेऊ शकतात किंवा मग ते प्रलंबित बिले मंजूर करण्याचा निर्णय घेऊ शकतात. एंटी-डिफेक्शन कायद्यानुसार पक्षाच्या आमदाराने व्हीपचे उल्लंघन करत या विधेयकाविरूद्ध मतदान केल्यास विधानसभेचे अध्यक्ष त्याविरोधात त्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भात कारवाई करू शकतात. हे कारवाई प्रकरण कायदेशीर असल्याने न्यायालयातही या प्रकरणाची सुनावणी होऊ शकते . दुसरीकडे , काँग्रेस आणि गांधी कुटंबाबाबत काहिसी नरमाईची भूमिका घेत असलेले सचिन पायलट यांच्याकडे या परिस्थितीत आता एकच पर्याय उरला असल्याचे मानले जात आहे. तो म्हणजे त्यांनी आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी पक्षाच्या बाजूने मतदान करावे किंवा मग विधानसभेच्या अध्यक्षांच्या कारवाईला सामोरे जावे. या बरोबरच त्यांच्यासमोर एक भीती देखील आहे. ती म्हणजे जयपूरला पोहोचल्यावर मुख्यमंत्री अशोक गहलोत सचिन पायलट यांना आमदारांच्या घोडेबाजार प्रकरणी एसओजीसमोर हजर होण्यास भाग पाडू शकतात . याचे कारण म्हणजे गेहलोत हे उचलत असलेली पावले पाहता ते सचिन पायलट यांना इतक्या सहजतेने माफ करण्याची शक्यता जवळ जवळ नाही, असे म्हटले जात आहे.

https://ift.tt/3fcy07h
July 24, 2020 at 12:31PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा