N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

चीनच्या अरेरावीवर भारताचा 'हाँगकाँग' उतारा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : तणावा दरम्यान चीनकडून अरेरावीपणा वाढल्याचं लक्षात येताच भारतानं स्ट्रॅटेजिक आणि आर्थिक अशा दोन्ही बाजुंनी चीनला घेरण्याचा प्रयत्न केलाय. भारतानं ५९ चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर चीनचा गोंधळ उडालाय. भारतानं आता चीनला घेरण्यासाठी स्वीकारलाय. आत्तापर्यंत हाँगकाँगच्या सुरक्षा कायद्यावर गप्प बसणाऱ्या भारतानं आता इशाऱ्यांतच या कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. बुधवारी जिनेवामध्ये () दरम्यान भारतानं हाँगकाँगचा मुद्दा उचलला. 'हाँगकाँगला '' घोषित करणं चीनचा देशांतर्गत प्रश्न आहे. परंतु, भारताची या घटनांवर नजर आहे. या घटनांवर चिंता व्यक्त करणारे अनेक वक्तव्य आम्ही ऐकत आहोत. आम्हाला आशा आहे की संबंधित पक्ष या गोष्टी ध्यानात ठेऊन त्यावर योग्य, गंभीर आणि निष्पक्ष समाधान काढतील' असं संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी यांनी म्हटलंय. उल्लेखनीय म्हणजे, भारतानं यावेळीही चीनचं नाव उच्चारलेलं नाही. वाचा : वाचा : वाचा : मानवाधिकार स्थितीवर जगभरात सध्या होत असलेल्या चर्चेदरम्यान भारतानं हे वक्तव्य केलंय. भारतानं पहिल्यांदाच हाँगकाँगच्या मुद्यावर भाष्य केलंय. वास्तविक नियंत्रण रेषेवर चीनच्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळेच गलवान खोऱ्यात भारत आणि चीन सैनिकांदरम्यान हिंसक हाणामारी झाली होती. भारत चीनी सैन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक हाणामारीनंतर दोन्ही देशांत चिंतेचं वातावरण आहे. या हाणामारीत २० भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले होते. चीनच्या बाजुलाही नुकसान झालं असलं तरी चीननं मात्र आपल्या जखमी-मृत सैनिकांची संख्या अद्याप जाहीर केलेली नाही. चीनसोबत भारताच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नुकतंच अमेरिकेनंही भारताला पाठिंबा दर्शवलाय. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो यांनी भारतानं चीनी अॅपवर केलेल्या बॅनचं समर्थन केलंय. क्लीन अॅपमुळे भारताचं सार्वभौमत्व, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत होईल, असं त्यांनी म्हटलंय. वाचा : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
July 02, 2020 at 10:01AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा