चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातमध्ये; शिवसेनेचा दावा
N4U
१०:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

मुंबई: 'लडाख संघर्षानंतर राष्ट्रीय सुरक्षेबाबत सरकारला डिजिटल जाग आली आहे. त्यातूनच चिनी अॅप्सवर बंदी आली आहे. ही जाग येण्यामागे खरंतर जनतेचा रेटा आहे. ती जाग कायम राहावी. मात्र, फक्त अॅपवर बंदी घालून चीनचे कंबरडे मोडेल असे नाही. चीनचा भारतातील व्यापार व गुंतवणूक हा मोठा विषय आहे. चीनची सर्वात मोठी गुंतवणूक गुजरातसारख्या राज्यात आहे,' असा दावा शिवसेनेनं केला आहे. () गलवान खोऱ्यात भारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात अलीकडेच भारताचे २० जवान शहीद झाले. या घटनेनंतर देशात चीनविरोधात रोष निर्माण झाला व चीनला प्रत्युत्तर देण्याची मागणी होऊ लागली. त्यानंतर मोदी सरकारनं चीनच्या ५० अॅप्सवर बंदी घातली आहे. हे चिनी अॅप्स भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, संरक्षण आणि जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोका असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. सरकारच्या या भूमिकेवर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून टीका करण्यात आली आहे. 'चिनी अॅप्सपासून राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे सरकारला नेमके कधी समजले? राष्ट्रीय सुरक्षेला धोका होताच तर मग इतकी वर्षे हे सर्व अॅप्स व त्यांचे व्यवहार आपल्या देशात बिनबोभाट कसे सुरू होते? त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रश्नाकडे सरकारने दुर्लक्षच केले, असा आरोप विरोधकांनी केला तर त्यावर सरकारची भूमिका काय असेल?,' असे प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केले आहेत. वाचा: भारतात '५ जी' नेटवर्क उभे करण्याचे कंत्राट चीनच्या हुवेई (Huawei) कंपनीला मिळाले आहे. या कंपनीच्या हाती भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेच्या चाव्या असणे म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेची भविष्यातील मालकी चिनी कम्युनिस्ट पार्टीकडे असण्यासारखे आहे. हे प्रकरण भविष्यात देशाला सर्वात जास्त घातक ठरणार आहे हे काय सरकारला कळू नये? 'पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या निर्णयाला दाद द्यावी लागेल. पण आपल्या देशातील माहितीचे भांडार बाहेर जात होते याचा साक्षात्कार आमच्या राज्यकर्त्यांना आता झाला व त्यासाठी लडाखच्या सीमेवर आमच्या २० जवानांना बलिदान द्यावे लागले,' अशी खंतही शिवसेनेनं व्यक्त केली आहे. टिकटॉक स्टार्सचे काय होणार? 'टिकटॉकसारखे चिनी अॅप अश्लीलता व इतर घाणेरड्या गोष्टींना उत्तेजन देत होते व त्यातून अनेक ‘टिकटॉक’ स्टार्स निर्माण झाले. यातील काही टिकटॉक स्टार्सनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या बातम्या आहेत. आता राजकारणात शिरलेल्या या चिनी टिकटॉक स्टार्सचे काय होणार,' असा खोचक सवालही अग्रलेखातून करण्यात आला आहे.
https://ift.tt/3fau8np
July 02, 2020 at 09:27AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा