N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

रस्ता नाही, पूल नाही... आदिवासी गर्भवतीला खांद्यावर उचलून नेलं!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
हैदराबाद : तेलंगणामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक जिल्हे प्रभावित झाले आहेत. जिल्ह्यातील नदीपात्राचं पाणी वाढल्यामुळे लोकांना वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावं लागतंय. भागात राहणाऱ्या एका गर्भवती महिलेसमोर रुग्णालयात पोहचण्याचीही समस्या मोठं संकट बनून उभी राहिली होती. परंतु, गावातील लोकांनी खांद्यावर उचलून तिला तलावाच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर आणलं. या महिलेचं नाव नुनवत ममता असं असल्याचं समजतंय. ममता या आठ महिन्यांनी गर्भार आहेत. त्रास जाणवल्यानं त्यांना गुंदलाच्या सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी जावं लागणार होतं. परंतु, तलावात पाणी भरल्यानं गुंदलापर्यंत जाणार कसं? या यक्षप्रश्न ममता यांच्या कुटुंबीयांसमोर उभा राहिला. लॉकडाऊन आणि पावसामुळे कोणतंही साधन मिळालं नाही त्यामुळे ममता यांना दुचाकीवर बसवून रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. दुचाकीवर मल्लना वगु तलावापर्यंत ते पोहचले. परंतु तलाव पाण्यानं भरलेला पाहून त्यांचे हात-पाय गळाले. तलावावर उभारण्यात आलेला देखील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्यानंतर काही ग्रामस्थांच्या मदतीनं कुटुंबीयांना ममता यांना खांद्यावर उचलून घेत पाणी वाढलेलं असतानाही तलाव पार केला. यात कुटुंबीयांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता. वाचा : वाचा : वाचा : तलाव पार केल्यानंतर कुटुंबीयांनी महिलेला गुंदलाच्या सरकारी रुग्णालयात दाखल केलं. ममता यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पावसाच्या प्रचंड जोरामुळे भद्राद्री कोथागुडेम जिल्ह्यातही अनेक नद्या-तलाव पाण्यानं भरलेत. किन्नरसानी, मल्लन्ना वगु यांसारखे अनेक भाग एडू मेलिकाला वागू तलावामुळे प्रभावित झालेत. सोबतच नदीचा प्रवाहाच्या वेगात वाढ झाल्यानं अनेक गावांचा संपर्कही तुटला आहे. गुंदला मंडलमध्ये मल्लन्ना वगु तलावावर बनवण्यात आलेला तात्पुरता पूलही पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलाय. नदीत पाणी भरल्यानं या भागातील लोकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय. प्रत्येक पावसाळ्यात नागरिकांना सरकारी रुग्णालयात पोहचण्यासाठी अशी अनेक आव्हानं पेलावी लागतात. मंडळ मुख्यालयाचं सरकारी रुग्णालय गावापासून ८ किलोमीटर दूर आहे. प्रत्येक पावसाळ्यात मनुगुरु, नरसम्पेता, वारंगळ यांसारख्या भागाचा गुंडलाशी संपर्क तुटतो. परंतु, अद्याप कोणताही सरकारी योजना या आदिवासी नागरिकांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
July 25, 2020 at 12:41PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा