rajya sabha election: देशातील ८ राज्यांमध्ये आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
N4U
९:५१ AM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: देशात करोनाचे संकट घोंघावत असतानाच निवडणुकीच बिगूल वाजल्याने राजकारणाची पारा आता वर चढला आहे. आमदारांना फोडणे, तसेच पक्षांमध्ये शह-काटशहाचा खेळ देखील चालला. आता मात्र निवडणुकीचा दिवस उगवला आहे. आज देशातील ८ राज्यांमधील राज्यसभेच्या होत आहे. काँग्रेस आण भारतीय जनता पक्षांचे अनेक मोठ्या नेत्यांनी कंबर कसली आहे. मध्य प्रदेशात राज्यसभेच्या ३ जागा आहेत. इथे ४ उमेदवार रिंगणात आहत. आणि काँग्रेसने येथे दोन-दोन उमेदवार मैदानात उतरले आहेत. तर गुजरातमधील ४ जागांवर पाच उमेदवार उभे आहेत. भारतीय जनता पक्षाने राज्यस्थानात ३ उमेदवार दिले आहेत. तर काँग्रेसने दोन उमेदवारांना रिंगणात उतरले आहे. राजस्थानाच देखील राज्यसभेच्या तीन जागा आहेत आणि उमेदवार आहेत ४. काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने प्रत्येकी २-२ उमेदवार दिले आहेत. झारखंडमध्ये राज्यसभेच्या २ जागा आहेत. इथे ३ उमेदवार लढत आहेत. जेएमएम, भाजप आणि काँग्रेस या पक्षांनी आपला एक-एक उमेदवार दिला आहे. आंध्र प्रदेशात एकूण ४ जागा आहेत आणि इथे एकूण ५ उमेदवार निवडणूक लढत आहेत. वाचा: तर मणिपूर, मेघालय आणि मिझोराम या राज्यांमध्ये राज्यसभेच्या १-१ जागेसाठी निवडणूक होत आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसच्या आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यसभेच्या दोन जागा जिंकण्याचे पक्षाचे गणित बिघडले आहे. बुधवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी डीनर पार्टीत बसपा, सप आणि इतर अपक्ष आमदार सहभागी झाल्याने भाजपचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. तर, काँग्रेसच्या बैठकीत पक्षाचे सुमारे ६ आमदार सहभागी न झाल्याने पक्षाच्या संकटात भर पडली आहे. मध्य प्रदेशात तीन राज्यसभेच्या जागांवर चार उमेदवार उभे राहिले आहेत. भाजपकडून ज्योतिरादित्य शिंदे आणि सुमेरसिंह सोलंकी, तर काँग्रेसकडून दिग्विजय सिंह आणि फूलसिंह बरैया यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. वाचा: गुजरातमध्ये काँग्रेसचे शक्तिसिंह गोहिल यांना प्रथम उमेदवार म्हणून उभे करण्यात आल्याने त्यांचा मार्ग सुकर झाला आहे. परंतु, भरतसिंह सोलंकींना आपली जागा जिंकण्यासाठी जोर लावावा लागणार आहे. झारखंडमध्ये लढत तुल्यबळ होणार आहे. आमदारांची संख्या पाहता शिबू सोरेन यांची एक जागा पक्की समजली जाते, तर दुसऱ्या जागेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये शह-काटशहाचा खेळ सुरू आहे. दोन्ही पक्ष आजसू (ऑल झारखंड स्टुडंट युनियन) आणि इतर आमदारांना आपल्याकडे वळवण्याच्या कामी लागले आहेत. वाचा: राजस्थानात तीन जागांवर निवडणूक आहे. काँग्रेसने के. सी. वेणुगोपाळ आणि नीरज डांगी यांना निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. तर, भाजपने राजेंद्र गहलोत आणि ओंकारसिंह लखावत यांना तिकीट दिले आहे. इथे काँग्रेसचा मार्ग सोपा असल्याचे जाणवते. मात्र, भाजपने दुसरा उमेदवार रिंगणात उतरवून बाजी उलटवण्याचा उलटवण्याचे संकेत दिले आहेत.
https://ift.tt/3fcy07h
June 18, 2020 at 06:01PM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा