N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

करोनावर आले आणखी एक औषध, 'गेमचेंजर' ठरण्याचा दावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्लीः भारतात करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील करोना (Coronavirus) रुग्णांचा एकूण आकडा हा ४ लाखांवर गेला आहे. या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एका औषधाला मंजुरी दिली आहे. ग्लेनमार्क फार्मा अँटीव्हायरल फेविपिरावीर हे औषध बाजारात आणणारा आहे. आता यानंतर औषध कंपनी Hetero करोनावरील उपचारासाठी अँटीव्हायरल औषध रेमडेसिवीर (Remdesivir) लाँच करणार आहे. रविवारी कंपनीने ही माहिती दिली. या औषधाला ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DGCI) मंजुरी दिली आहे. हे औषध 'Covifor' नावाने बाजारात विकले जाईल. Covifor गेमचेंजर ठरेल, कंपनीचा दावा करोनाचे संशयित रुग्ण आणि करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवरील उपचारासाठी हे औषध वापरण्यास डीजीसीआने परवानगी दिली आहे. यासोबतच करोनाच्या गंभीर रुग्णांनाही हे औषध देता येणार आहे. भारतात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने Covifor औषधाला मंजुरी मिळाल्याने हे औषध गेमचेंजर ठरेल. या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या अतिशय सकारात्मक आल्या आहेत. देशभरातील करोना रुग्णांना हे औषध त्वरीत देण्यास कंपनीने तयारी केली आहे, असं Hetero ने म्हटलंय. औषधाची किंमत मात्र स्पष्ट झालेली नाही. 100mg इंजेक्शनच्या स्वरुपात औषध Covifor औषध हे 100mg इंजेक्शनच्या स्वरुपात उपलब्ध होईल. डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीत हे इंजेक्शन रुग्णाला द्यावं लागेल. कंपनीने यासाठी अमेरिकेतील Gilead Sciences Inc या कंपनीशी करार केला आहे. यामुळे करोनावरील उपचार विस्तारता येईल. सध्याच्या गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी औषधाचा आवश्यक पुरवठा करण्यास तयार आहे, असं Hetero कंपनीच्या प्रमुखांनी सांगितलं. करोनावर ग्लेनमार्क फार्माचे 'फेविपिरावीर' ग्लेनमार्क फार्मान करोनाचे सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी औषध आणले आहे. याची एका गोळीची किंमत ही १०३ रुपये इतकी आहे. ३४ गोळ्यांच्या एका स्ट्रीपची किंमत ३५०० रुपये इतकी आहे. करोना व्हायरसची सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णावर फेविपिरावीर औषध परिणामकारक ठरेल, असा दावा ग्लेनमार्क फार्माने केला आहे. ग्लेनमार्कने फैबीफ्ल्यू ( FabiFlu) या ब्रँड अंतर्गत फेविपिरावीर औषध सादर केले आहे. फेविपिरावीरचे उत्पादन आणि विक्री करण्याची परवानगी भारतीय औषध महानियंत्रकाने ग्लेनमार्क फार्माला दिली आहे. त्यामुळे लवकरच हे औषध बाजारात उपलब्ध होणार आहे.

https://ift.tt/3fcy07h
June 21, 2020 at 01:48AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा