करोना: देशात रुग्णांची संख्या साडेचार लाखांच्या वर, ४ दिवसात वाढले ६० हजार रुग्ण
N4U
९:१६ AM
India News
,
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
नवी दिल्ली: देशातील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात एकूण रुग्णांचा आकडा साडेचार लाखांत्या वर पोहोचला आहे. भारतातील सध्या एकूण रुग्णांची संख्या ४ लाख ५६ हजार ११५ वर पोहोचली आहे. यात १४ हजार ४८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या साथीच्या आजारातून आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोक बरे झाले आहेत. देशभरात दररोज सुमारे १५ हजार नवे रुग्ण वाढत आहेत. १९ जून या दिवशी रुग्णांची संख्या ३ लाख ९५ हजार इतकी होती. चार दिवसांनंतर म्हणजेच २३ जूनला ती वाढून ४ लाख ५६ हजारच्या पुढे गेली. तर, १९ जूनपर्यंत सुमारे १३ हजार लोकांचा मृत्यू झाला होता. तर २३ जूनला मृत्यू झालेल्यांची संख्या पोहोचली १४ हजार ४८३ वर. म्हणजेच फक्त ४ दिवसांमध्ये सुमारे १५०० रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. करोनाच्या रुग्णसंख्येचा विचार करता भारत जगात चौथ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर आहे अमेरिका. अमेरिकेत एकूण रुग्णांची संख्या २४ लाखाहून अधिक आहे आणि १.२३ लाखांहून अधिक रुग्ण मृत्यू पावलेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे ब्राझील. या देशात एकूण रुग्णसंख्या ११ लाखांपेक्षा अधिक आहे. तर ५२ हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नक्की पाहा: तिसऱ्या क्रमांकावर आहे रशिया. रशियात रुग्णांची संख्या ६ लाखांच्या आसपास आहे. तर येथे एकूण ८,३५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, संपूर्ण जगाचा विचार करता या साथीच्या आजाराने २०० हून अधिक देशांना ग्रासले आहे, कर एकूण रुग्णांची संख्या ९३ लाखांच्याही पुढे गेली आहे. तसेच जगभरात ४ लाख ७९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. वाचा: गेल्या काही दिवसांपासून जगभरात दररोज दीड लाखांहून अधिक लोकांना करोनाची लागण होत आहे. तसेच कोविड-१९ या आजारातून तब्बल ५० लाख लोक बरे झाले आहेत. सध्या संपूर्ण जगात सक्रिय रुग्णांची संख्या ३८ लाखांहून अधिक आहे. यां पैकी ५७ हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती गंभीर आहे. वाचा:
https://ift.tt/3fcy07h
June 24, 2020 at 08:43AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा