कोणताही सच्चा मुंबईकर 'हे' सहन करणार नाही... कंगनाला 'मनसे' स्टाइल इशारा
N4U
९:०५ AM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
मुंबई: मुंबई पोलिसांवर सातत्यानं आरोप व टीका करणारी अभिनेत्री हिला आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं खास स्टाइलने समज दिलीय. 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही. मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर खुशाल आपल्या राज्यात निघून जा. याला धमकी समजा किंवा सल्ला... असा इशारा मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष यांनी कंगनाला दिला आहे. सुशांतसिंह प्रकरणात हिरीरीनं बोलणाऱ्या कंगनाने एखाद्या राजकीय नेत्याच्या थाटात मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. 'गुंड व माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. मला हिमाचल प्रदेश किंवा केंद्र सरकारची सुरक्षा द्या. मुंबई पोलिसांची कृपया नको,' असं ट्वीट कंगनानं केलं होतं. त्यावरून मोठा गदारोळ उठला आहे. शिवसेना व काँग्रेसनं कंगनावर जोरदार टीका केली होती. मनसेनंही आता तिला आपल्या खास स्टाइलनं समज दिली आहे. वाचा: अमेय खोपकर यांनी मुंबई पोलिसांचं कौतुक करणारं एक ट्वीट केलं आहे. त्याद्वारे नाव न घेता कंगनाला इशारा दिला आहे. 'माझ्या मुंबई पोलिसांबद्दल 'जजमेंटल' होऊन कोणीही 'पंगा' घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरून घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे . आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा ताण कितीही असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो... कशाचीही पर्वा न करता हिंमतीने उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते, त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला,' असं खोपकर यांनी म्हटलं आहे. वाचा: वाचा:
https://ift.tt/3fau8np
September 05, 2020 at 07:36AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा