N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

तणावात भर! लडाख सीमेवर भारत-चीनचे सैनिक, टँक समोरासमोर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
नवी दिल्ली : पूर्व लडाखच्या चुशूल सेक्टरमध्ये चीनकडून सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलीय. परंतु यापूर्वीच भारतीय सैनिकांनी 'ठाकुंग'पासून 'रेक इन पास'पर्यंत अनेक महत्त्वाच्या अनेक टेकड्यांवर आपली स्थिती मजबूत केलीय. त्यामुळेच या भागात दोन्ही शेजारी देशांचे मोठ्या संख्येत एकमेकांसमोर उभे ठाकलेले दिसत आहेत. सैनिकांसोबतच या भागात , हत्यारयुक्त वाहनं आणि तोफाही तैनात करण्यात आल्या आहेत. लष्करप्रमुखांचा लडाख दौरा दरम्यान गुरुवारी यांनी चुशूल सेक्टरमध्ये संरक्षणाचा आढावा घेतला. शुक्रवारी दिल्ली परतण्यापूर्वी ते उत्तरेकडील आघाडीच्या चौक्यांनाही भेट देणार आहेत. वायुसेना प्रमुखांचंही लक्ष लडाख ते अरुणाचल प्रदेशापर्यंत ३,४८८ किलोमीटरच्या वास्तविक नियंत्रण रेषेवर () शीगेला पोहचलेल्या तणावादरम्यान भारतीय वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल आर के एस भदौरिया यांनीदेखील बुधवारी या भागाचं निरीक्षण केलं. हाशिमारा (Hashimara) सहीत संपूर्ण पूर्व भागातील आघाडीच्या लष्करी विमानतळांचा त्यांनी आढावा घेतला. 'एलएसीवर मोठ्या संख्येत सैनिक आणि हत्यारांच्या तैनातीमुळे परिस्थिती गंभीर बनलीय. परंतु, पूर्व लडाख भागात स्थिती विस्फोटक बनलीय' असं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. वाचा : वाचा : दुसरीकडे, भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 'शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन'च्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दाखल झालेत. त्यांनी रशियाचे संरक्षण मंत्री सर्गेई शोइगू (General Sergei Shoigu) यांची भेट घेतलीय. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, चीनचे संरक्षण मंत्री वेई फेंगे (Wei Fenghe) यांनी आपले समकक्ष राजनाथ सिंह यांच्यासोबत शुक्रवारी बैठकीसाठी वेळ मागितलीय. परंतु, भारताकडून अद्याप यावर कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. एलएसीवर तणावादरम्यान दोन्ही देशांत ब्रिगेडियर स्तरावर चर्चा सुरूच आहे. चुशूल - मोल्डो बॉर्डर पॉईंटवर गुरुवारी चौथ्या टप्प्यात चर्चा झाली. परंतु, ही चर्चादेखील निष्फळ ठरली. वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
September 04, 2020 at 09:40AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा