घृणास्पद! अवघ्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या
N4U
११:१६ AM
India News in Marathi: Breaking News India in Marathi | Maharashtra Times
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:
लखनऊ : उत्तर प्रदेशातल्या () जिल्ह्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून हत्या करण्यात आलीय. गुरुवारी उसाच्या शेतात या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. लैंगिक अत्याचारानंतर मुलीचा गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. उल्लेखनीय म्हणजे, लखीमपूर खीरी जिल्ह्यात गेल्या २० दिवसांत घडलेली ही बलात्काराची तिसरी घटना आहे. संबंधित तीन वर्षांची मुलगी बुधवारपासून बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, गुरुवारी गावाजळच या मुलीचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळून आला आणि तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. मुलीच्या डोक्यावर वार करण्यात आल्याच्या खुणा आहेत. मुलीच्या वडिलांनी गावातच राहणाऱ्या एका व्यक्तीवर आपल्या मुलीच्या खुनाचा आरोप केलाय. जुन्या शत्रुत्वामुळे आपल्या करून तिची हत्या करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय. पोलीस या बाजूनंही या घटनेचा तपास करत आहेत. पोलिसांनी ही हत्येची घटना असल्याचं म्हटलंय. मुलीच्या मृतदेहाच्या ऑटोप्सी (Autopsy) मध्ये लैंगिक अत्याचाराच्या संशयाला दुजोरा मिळाला. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलिसांनी चार टीम तैनात केल्यात. वाचा : वाचा : लखीमपूर खीरी जिल्हा बलात्काराच्या घटनांसाठी चर्चेत काही दिवसांपूर्वी आणखीन एक अल्पवयीन मुलगी स्कॉलरशीपचा फॉर्म भरण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर गायब झाली. तिचा मृतदेह गावाच्या बाहेर आढळून आला. कथितरित्या या मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली होती. तिचा मृतदेह गावापासून जवळपास २०० मीटर अंतरावर एका सुकलेल्या तलावाजवळ सापडला होता. त्यापूर्वी एका १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येचं प्रकरण समोर आलं होतं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुलगी दुपारी शेतात गेली होती मात्र त्यानंतर ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर या मुलीचा मृतदेह एका उसाच्या शेताजवळ सापडला होता. एकामागोमाग घडलेल्या या घटनांमुळे लखीमपूर खीरी जिल्हा चर्चेत आलाय. या घटनांमुळे नागरिकांमध्ये आक्रोश आणि भीतीचं वातावरण आहे. सोबतच काँग्रेस आणि समाजवादी पक्षानं राज्यात बिघडलेल्या कायदे-व्यवस्थेसाठी सरकारला जबाबदार धरलंय. वाचा : वाचा :
https://ift.tt/3fcy07h
September 04, 2020 at 10:15AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा