N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

​Video : तिरुअनंतपुरम ते कोची ४० मिनिटांत... एका हृदयाचा प्रवास!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
तिरुअनंतपुरम : करोनाचं संकट आणि लॉकडाऊन दरम्यान पोलिसांनी आपल्या हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं एका मृत:प्राय व्यक्तीला जीवदान दिलंय. एका ब्रेन डेड महिलेचं हृदय घेऊन या हेलिकॉप्टरनं तिरुअनंतपुरम ते एर्नाकुलम असा २२० किलोमीटरचा प्रवास केवळ ४० मिनिटांत पूर्ण केला. लॉकडाऊन दरम्यान रस्ते मार्गानं हे काम अशक्य वाटत असताना केरळ पोलिसांनी ही कल्पना सत्यात उतरवून दाखवलीय. हे हृदय एका ४९ वर्षांच्या एक महिलेच्या शरीरात प्रत्यारोपित करण्यात आलंय. ही महिला गेल्या वर्षभरापासून हृदयविकारानं त्रस्त आहे. केरळचे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिरुअनंतपुरमच्या रहिवासी असलेल्या लाली गोपाकुमार या महिलेच्या कुटुंबीयांनी मानवतेच्या आधारावर त्यांचं हदृ, फुफ्फुस आणि डोळे दान करण्याचा निर्णय घेतला होता. विजयन यांनी करोनासारख्या जीवघेण्या संकटादरम्यान असा निर्णय घेणं हे मोठं धाडसाचं आणि कौतुकास्पद काम असल्याचं म्हटलंय. या ब्रेन डेड महिलेचं हृदय एर्नाकुलमच्या एका खासगी रुग्णालयात पोहचवायचं होतं... तेही वेळेत... लॉकडाऊनमुळे अनेक जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ते मार्गानं या प्रवासासाठी उशिर झाला असता. त्यामुळे राज्य सरकारनं कोणत्याही खर्चाशिवाय आपलं उपलब्ध करून दिलं. वाचा : वाचा : हेलिकॉप्टरच्या मदतीनं या हृदयानं तिरुअनंतपुरम ते एर्नाकुलम हे अंतर केवळ ४० मिनिटांत कापलं. त्यानंतर एका अॅम्ब्युलन्सद्वारे हे हृदय रुग्णालयापर्यंत पोहचवण्यात आलं. राज्य सरकारनं याच वर्षी 'पवन हंस कंपनी'कडून हेलिकॉप्टर प्रती महिना १.४४ कोटी रुपयांत भाडे तत्त्वावर घेतलं आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधकांकडून मोठी टीकाहीी करण्यात आली होती. हे हेलिकॉप्टर नैसर्गिक आपत्ती, बचाव आणि मदत कार्यासाठी भाडे तत्वावर घेण्यात आल्याचं स्पष्टीकरण राज्य सरकारकडून देण्यात आलंय. करोनाची आकडेवारी करोनाच्या आकडेवारीविषयी बोलायचं झालं तर केरळमध्ये सध्या ८०६० जणांवर उपचार सुरू आहेत. तर तब्बल ५८९० जणांनी करोनावर यशस्वीरित्या मात केलीय. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत एकूण १३९९४ जणांना करोना संक्रमणानं गाठलंय. तर राज्यात ४४ जणांनी आपले प्राण गमावलेत. वाचा : वाचा : वाचा :

https://ift.tt/3fcy07h
July 22, 2020 at 12:02PM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा