N4U-Marathi

मराठी बातम्या खास तुमच्यासाठी.

सचिन पायलट प्रकरण सुप्रीम कोर्टात जाणार; HC च्या निर्णयाविरुद्ध विधानसभाध्यक्ष देणार आव्हान

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :
जयपूर: राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष आणि यांच्यातील राजस्थान हायकोर्टातील लढाई आता सुप्रीम कोर्टाच पोहोचली आहे. सचिन पायलट गटाला काहिसा दिलासा देणाऱ्या राजस्थानच्या हायकोर्टाच्या निर्णयाला राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी सुप्रिम कोर्टात आव्हान देणार आहेत. जे काही राजस्थान हायकोर्टात झाले तो सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या आदेशाचे उल्लंघन आहे, असेही जोशी म्हणाले. मंगळवारी राजस्थान हायकोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान सचिन पायलट आणि बंडखोर आमदारांना दिलास देत विधानसभा अध्यक्षांनी या गटावर शुक्रवार पर्यंत कोणतीही कारवाई करू नये असा आदेश दिला होता. कोर्टाने या प्रकरणावरील आपला निर्णय राखून ठेवला आहे. कोर्ट आपला निर्णय शुक्रवारी देणार आहे. दरम्यान, आपल्याला नोटीस देण्याचा अधिकार असून जे काही झाले ते संसदीय लोकशाहीविरोधी आहे. विधानसभा अध्यक्षांना नोटीस देण्याचा पूर्ण अधिकारआहे. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानंतर कोर्टात जाता येते. मात्र हा करण्यात आलेला प्रयत्न म्हणजे संसदीय लोकशाहीला धोका आहे. मी केवळ कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याचे सांगत, काय मला हा अधिकार नाही का, असा प्रश्नही विधानसभा अध्यक्ष सी. पी. जोशी यांनी म्हटले आहे.

https://ift.tt/3fcy07h
July 22, 2020 at 11:24AM

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत :

टिप्पणी पोस्ट करा