नगर हादरलं; बलात्कारानंतर तरुणीला रस्त्यावर निर्वस्त्र सोडलं
N4U
१२:०५ PM
महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
,
Latest Maharashtra News in Marathi
,
Maharashtra News
कोणत्याही टिप्पण्या नाहीत
:

म. टा. प्रतिनिधी, नगर: नगर शहरातील कल्याण रोडवरील रेल्वे पुलाजवळ एका युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. धक्कादायक म्हणजे आरोपीने पीडित तरुणीला रस्त्यावरच सोडून दिले. पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून तिच्यावर शिंगवे नाईक (ता. नगर) येथील माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेत उपचार सुरू आहेत. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या डॉ. सुचिता धामणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून, या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात अत्याचार करणाऱ्याविरोधात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी अभय बाबूराव कडू (रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) याला ताब्यात घेतले आहे. सोमवारी सकाळी नगर शहरातील चांदणी चौक येथे एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही लोकांच्या निदर्शनास आली. याबाबतची माहिती त्यांनी माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिली. त्यानंतर संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे या तेथे आल्या. तेव्हा त्यांना संबंधित पीडित युवती खूप आरडाओरड करत असल्याचे दिसले. माझ्यावर कडू नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला, असे ही पीडित युवती म्हणत होती. धामणे यांनी या तरुणीला एका रुग्णवाहिकेतून आपल्या संस्थेत नेले. तिच्यावर त्याठिकाणी उपचार सुरू करण्यात आले. सोमवारी पीडित तरुणीला मानसिक धक्का बसल्याने ती काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. काल सकाळी मात्र ती आरडाओरड करू लागली. त्यावेळी डॉ. धामणे यांनी तिला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता, तिने तिचे नाव सांगून वर्धा जिल्ह्यात राहत असल्याचे सांगितले. तसेच अभय कडू नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगत तिने सर्व घटनाक्रम सांगितला. पुणे येथून अभय कडू याच्याबरोबर येत असताना त्याने नगरच्या जवळ रेल्वेपूल ओलांडल्यानंतर गाडी अंधारात थांबवली व अत्याचार केल्याचे पीडितेने सांगितले. त्यानंतर तातडीने डॉ. सुचिता धामणे यांनी याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी अभय बाबुराव कडू याच्या विरोधात काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. एम. मुंढे करीत आहेत.
https://ift.tt/3fau8np
July 22, 2020 at 10:41AM
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत :
टिप्पणी पोस्ट करा